आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress ncp Seat Sharing Formula, Congress Ready To Give 128 Seats For Ncp

काँग्रेसकडून NCPला 128 जागांचा प्रस्ताव; वाढीव 14 मतदारसंघाची नावेही कळवली!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतही बिघाडी होण्याचीच दाट शक्यता असल्याने काँग्रेसने चर्चेसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले असून राष्ट्रवादीला 128 जागा देऊ केल्या आहेत. 2009 साली काँग्रेसने राष्ट्रवादीला 114 जागा दिल्या होत्या. आता त्यात 14 जागा अधिकच्या देऊ केल्या आहेत. काँग्रेसने या जागा वाढवून देताना 14 ही मतदारसंघाची नावे राष्ट्रवादीला कळवली आहेत. दरम्यान, यातील 12 जागा अपक्ष व राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार असलेल्याच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला हा प्रस्ताव मान्य होण्याची शक्यता कमी आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आज सकाळी पुन्हा बोलावण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अंतिम व आघाडी तोडण्याचा अथवा करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता अधिक आहे. आज सायंकाळपर्यंत याबाबत काहीतरी अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.