आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एमआयएमचा धसका, काँग्रेसचे मुस्लिम ‘नमो’; १०० इमाम, मौलवींच्या घेतल्या भेटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/औरंगाबाद/ नांदेड - औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमला मिळालेल्या यशामुळे काँग्रेस पक्ष हादरला आहे. हा पारंपरिक मतदार पक्षापासून जास्त दूर जाऊ नये यासाठी राज्य काँग्रेसने यापुढील लोकसभा ते पालिका अशा सर्व निवडणुकांत मुस्लिमांंना जास्त तिकिटे देण्याचे धोरण अंगीकारण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार पक्षाच्या नेत्यांनी आतापर्यंत १०० इमाम, मौलवींशी चर्चा केली आहे. मुस्लिमबहुल भागात योग्य मुस्लिम उमेदवारांना तिकिटे देण्याचे काँग्रेसने आता ठरवले असल्याची माहिती मुंबई काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष निझामुद्दीन रेईन यांनी दिली.

रेईन म्हणाले इमाम, मौलवी तसेच मदरशांना गाठी-भेटी व चर्चा हा आमच्या या धोरणाचा एक भाग आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम या दोघांनी आतापर्यंत १०० मौलवी, इमाम यांच्याशी चर्चा केली आहे.

मुस्लिम मतदार हा राज्यातील काँग्रेसची हक्काची व्होट बँक होता. परंतु ही व्होट बँक एमआयएमकडे वळल्याने ती पुन्हा आपलीशी करण्याची खास मोहीमच काँग्रेसने हाती घेतली आहे.

ध्रुवीकरण राेखण्याचा प्रयत्न
भाजप-शिवसेनेकडून सुरू असलेल्या हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाला शह देऊन सामाजिक एकोपा कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे. सामाजिकदृष्ट्या हे महत्त्वाचे आहे. - अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
बातम्या आणखी आहेत...