आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोळवलकर, सावरकरांचे विचार संघ-भाजप नाकारणार काय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर गुरुजी आणि वि. दा. सावरकर यांनी मुस्लिम आणि ख्रिश्चनांना दुय्यम वागवण्याची घेतलेली भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप नाकारणार काय, असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने भाजपवर हल्ला चढवला. गुजरात दंगलीनंतर मोदी हेच आपला अजेंडा खर्‍या अर्थाने राबवू शकतात, ही खात्री झाल्यानेच संघाने मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार केले, असा आरोपही काँग्रेसने केला.

‘भाजपने जाहीरनाम्यात हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे भाजपला डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रवाद अनुसरायचा की सावरकर-गोळवलकर यांनी दाखवलेल्या हिंदुत्वाच्या मार्गावर जायचेय? याबद्दल भूमिका स्पष्ट केली पाहिजे,’ अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी पत्रकार परिषदेत केली.

‘बंच ऑफ थॉट्स पुस्तकात गोळवलकर गुुरुजी यांनी भारतात मुस्लिम आणि ख्रिश्चनांनी हिंदूंच्या मर्जीप्रमाणे राहिले पाहिजे,’ अशी भूमिका मांडली होती. सावरकरांनीही मुस्लिम आणि ख्रिश्चनांना दुय्यमत्व बहाल केले होते. डॉ. आंबेडकरांनी जशी मनुस्मृती नाकारली तसे गोळवलकर आणि सावरकरांचे हे विचार भाजप नाकारणार काय,’ असा सवालही दलवाई यांनी केला.