आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस संतापली: ‘शहिदांच्या विधवांचा विषय काढून दिशाभूल’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नांदेड येथील सभेत अशोकराव चव्हाण यांचे नाव न घेता आदर्श घोटाळ्यावर भाष्य करत शहिदांच्या विधवांचा विषय काढणारे मोदी यांचे नेतृत्व ढोंगी आणि भंपक असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. इतरांना प्रश्न विचारण्याचा राष्‍ट्रीय ठेका घेतलेले मोदी त्यांना विचारलेल्या प्रश्नांची मात्र कधीच उत्तरे देत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगवास भोगलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा, असेच आरोप असलेले श्रीरामुलू, गुजरातेत पुरुषोत्तम सोलंकी आणि बाबू बोखारिया यांना मंत्रिपदाची दिलेली बक्षिसी, मुजफ्फरनगर दंगलीतील दोन आरोपींना दिलेली तिकिटे, असे संदर्भ देत सावंत यांनी मोदींवर प्रखर टीका केली. मुतालिक व साबीर अली यांना भलेही भाजपने आता काढले असले तरी त्यांना पक्षात प्रवेश दिला जात असताना हेच मोदी मूग गिळून गप्प होते, असा प्रहार सावंत यांनी केला. आदर्श प्रकरणातील जमीन कारगिल शहिदांच्या नातेवाइकांसाठी नव्हती, हे सिद्ध झाले असतानाही शहिदांच्या विधवांचा विषय काढून जनतेची दिशाभूल करणारे नरेंद्र मोदी याच आदर्श इमारतीत भाजप खासदार अजय संचेती यांचे 9 बेनामी फ्लॅट असल्याबाबत काहीच कसे बोलत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महाराष्टÑातील दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी मदत म्हणून पाठवलेल्या पशुखाद्याचे पैसे मागणा-या नरेंद्र मोदींना महाराष्टÑाची जनता ओळखून आहे. महाराष्टÑाचा सतत अवमान करणा-या मोदींनी राज्यात येऊन काँग्रेसला धडा शिकवण्याच्या वल्गना करू नयेत, असा इशाराही सावंत यांनी दिला.