आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress News In Marathi, Mumbai Publicity, State Election

काँग्रेस प्रचाराचा एक सप्टेंबरला प्रारंभ, आझाद मैदानात प्रज्वलित करणार महाज्योत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा येत्या सप्टेंबर रोजी मुंबईत शुभारंभ होईल. काँग्रेसच्या प्रचार समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता काँग्रेसचे प्रमुख नेते हुतात्मा चौकात शहिदांना अभिवादन करतील. त्यानंतर प्रचार ज्योत प्रज्वलित केली जाईल ही ज्योत आझाद मैदानात आणून महाज्योत पेटवली जाईल. या महाज्योतीतून राज्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक ५४ जिल्ह्यांसाठी ५४ ज्योती प्रज्वलित केल्या जाणार असून त्या संबंधित जिल्ह्यांमध्ये नेऊन तेथेही प्रचार मोहिमेला सुरुवात केली होईल.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, समन्वय समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण, प्रचार समितीचे अध्यक्ष उद्योग नारायण राणे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री मुकुल वासनिक, माध्यमे प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील पदाधिकारी उपस्थित राहतील. या कार्यक्रमानंतर गांधी भवन येथे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्षांच्या बैठकी आयोजित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसने आपल्या प्रचाराची तारीख जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आपली तारीख कधी जाहीर करते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच शिवसेना भाजपही आपल्या प्रचाराची तारीख लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे.