आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress News In Marathi, Narendra Modi, Divya Marathi

काँग्रेसलाही मोदींची भुरळ, आता तरुण वर्गावर केले लक्ष केंद्रित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभा नविडणुकीत मोदींना मिळालेला तरुणांचा प्रतिसाद पाहता आता कॉँग्रेसनेही आगामी नविडणुकीत तरुण वर्गावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात तसेच प्रचाराच्या केंद्रस्थानी तरूणांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षांना स्थान देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या प्रसदि्धी आणि प्रसारमाध्यम समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
तरूण मतदारांची वाढती संख्या आणि लोकसभा नविडणुकीत तरुण मतदारांनी भाजपला दिलेला हात पाहता कॉंग्रेसनेही या वोटबँकेला आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. लोकसभा नविडणुकीच्या मतदानाचा सखोल अभ्यास केल्यानंतर एकूण मतदानाच्या 10 ते 12 टक्के मते ही तरूण मतदारांची होती आणि ती भाजपच्या पारड्यात गेल्याचे कॉंग्रेसला आढळले. त्याच्या कारणांचा शोध घेतला असता भाजपच्या जाहीरनाम्याची रुपरेषा आणि प्रचाराची आखणी करताना तरुणांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यात आला होता. त्यामुळे हा पक्ष आपली भाषा बोलतो ही भावना तरूण वर्गाची झाली आणि त्याचा फायदा भाजपला झाला होता.
या बाबींचा अभ्यास केल्यानंतर कॉंग्रेसनेही आपल्या प्रचाराच्या आणि जाहीरनाम्याच्या केंद्रस्थानी तरूण वर्ग ठेवण्याचे ठरवले आहे. इतकेच नव्हे तर झेंडे, टोप्या या सारख्या पारंपरिक प्रचारसाहित्यांना फाटा देत आजकालच्या तरूणांना भावेल असे रिस्टबँड सारखे नवे प्रचार सािहत्य वापरण्याचे ठरवल्याची मािहती प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचनि सावंत यांनी दिली. काॅंग्रेसच्या जाहीरनाम्यातही तरूणांच्या मतांचा विचार केला जाणार असून जाहीरनाम्यासाठी त्यांच्या सुचना मागवण्यात येणार आहेत, असे सावंत म्हणाले.
जाहीरनाम्यासाठी कुणाला काही सुचना पाठवायच्या असतील तर त्या कशा पाठवाव्या याची माहिती लवकरच पक्षाच्या वतीने जाहीर केली जाणार आहे.

जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र
गेल्या पंधरा वर्षात आघाडी सरकारच्या कार्यकाळात झालेली प्रगती लोकांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच आगामी काळात राज्याची स्पर्धा कशी जागितक स्तरावर असेल याचे चित्र लोकांसमोर नेण्याचा प्रयत्न जाहीरनाम्याच्या माध्यमातून केला जाणार आहे. देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र कसा पुढे आहे आणि आता महाराष्ट्राची स्पर्धा देशातल्या इतर राज्यांशी नसून जगातल्या प्रगत देशांशी कशी आहे हे दाखवून देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.