आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बबनराव लाेणीकरांवर काँग्रेसचा दुसरा ‘बाॅम्ब’, पत्नीची माहिती दडवल्याचा अाराेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शैक्षणिक अर्हतेची खाेटी माहिती दिल्याच्या अाराेपापाठाेपाठ काँग्रेसने पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर शुक्रवारी सलग दुसरा अाराेप केला. ‘लाेणीकर यांना दाेन पत्नी असताना त्यांनी निवडणूक अायाेगाकडे दिलेल्या शपथपत्रात एकाच पत्नीचा उल्लेख करून, एकीची माहिती लपविली,’ असा अाराेप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

‘परतूरच्या मतदार यादीत बबनराव यादव (लोणीकर) यांच्या पाठोपाठ मंदाकिनीताई आणि वंदनाताई अशा दोन महिलांची नावे असून, दोघींच्याही माहितीमध्ये पती म्हणून बबनराव यांचेच नाव नमूद आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील यादीत लोणीकर यांच्या नावापुढील ‘फॅमिली’ टॅबवर क्लिक केल्यासही कौटुंबिक सदस्यांच्या यादीत या दोघींचीही नावे आहेत. मात्र शपथपत्रात लाेणीकर यांनी पत्नी म्हणून केवळ मंदाकिनीताईंचाच उल्लेख करून माहिती लपवली,’ असे सावंत म्हणाले. पदवीप्रकरणी खुलासा करताना लाेणीकरांनीही परतूरच्या ज्या केंद्रातून मुक्त विद्यापीठाची १९९१ साली परीक्षा दिली असे सांगितले अाहे, प्रत्यक्षात या केंद्राला मान्यताच २००६ मध्ये मिळाली असल्याचे सांगत, लाेणीकरांचा दावा खाेटा असल्याचे सावंत म्हणाले.