आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Congress Party Started Campaign From Today For Upcoming Assembly Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटला, पावसामुळे प्रतिसाद कमी तरीही राणे जोरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढविला. यावेळी राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते)
मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज प्रचाराचा नारळ वाढविला. मुंबईत हुतात्मा चौकात 105 हुतात्म्यांना अभिवादन करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव मोघे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्यानंतर ही महाज्योत आझाद मैदानात आणून पेटवण्यात आली. या महाज्योतीतून राज्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक 54 जिल्ह्यांसाठी 54 ज्योती प्रज्ज्वलीत करण्यात आल्या. आता या ज्योती त्या-त्या संबंधित जिल्ह्यांमध्ये नेऊन तेथेही प्रचार मोहिमेला सुरूवात केली जाईल.
दरम्यान, मुंबईत संततधार पाऊस पडत असल्यामुळे काँग्रेसच्या प्रचाराच्या शुभारंभाला कमी प्रतिसाद मिळाला. असे असले तरी नारायण राणेंनी भाजप व मोदीविरोधी फटकेबाजी करून रंगत आणली.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सोलापूरच्या सभेत मोदींनी व भाजपने जाणून माझा अपमान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यापुढे हे सहन केले जाणार नाही. राज्यातील जनता सुज्ञ आहे. अशा प्रकारचे गलिच्छ राजकारण महाराष्ट्र सहन करणार नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारने केलेल्या कामांची माहिती जनसामान्यांना पोहचवावी असेही मुख्यमंत्री चव्हाण यांनी आवाहन केले.
प्रचार प्रमुख समितीचे प्रमुख राणे म्हणाले, भाजप किती थापाडा आहे हे लोकांना कळून चुकले आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार पुन्हा राज्यात निवडून येणार आहे. बाजूच्या राज्यातून कोणी येथे प्रचाराला आले तरी काहीही फरक पडणार नाही असे सांगत शहा-मोदींना लक्ष्य केले. भाजपने आमच्यावर आरोप करण्यापूर्वी स्वत:ला तपासावे. भाजप काही धुतल्या तांदळासारखा नाही. मोदींना भ्रष्टाचाराचे वावडे आहे तर कर्नाटकातील येडियुरप्पांना पक्षाने उपाध्यक्षपद कसे दिले असा सवाल राणेंनी उपस्थित केला.
भाजप व मोदी हवेवर निवडून आले आहेत. ही हवा कशी फुसकी होती ते लोकांना कळून चुकले आहे. त्यामुळे लोकसभेच्या निकालासारखे निकाल लागणार नाहीत असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होईल असा मला विश्वास आहे. तरीही हायकमांड जे निर्णय घेतील त्यानुसार आम्ही पावले टाकू, असे आघाडीबाबत राणेंनी मत व्यक्त केले.
मुंबईत हुतात्मा चौकात 105 हुतात्म्यांना अभिवादन करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रचाराचा शुभारंभ केला, या संंबंधित छायाचित्रे पाहा पुढे...