आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणे लढवय्ये, त्यांनी चांगली लढत दिली- अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वांद्र्यात नारायण राणे यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी चांगली लढत दिली आहे. राणे लढवय्ये आहेत, त्यांच्यासारख्या राजकीय नेत्याला एखाद-दुस-या पराभवाने फरक पडत नाही, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नारायण राणे यांची पाठराखण केली आहे.
अशोक चव्हाण म्हणाले, आम्हाला अपेक्षित अशी कामगिरी या पोटनिवडणुकीत बजावता आली नाही हे मान्य पण राणेंनी चांगली लढत दिली. ही जागा शिवसेनेचीच होती व बाळा सावंत यांच्या निधनामुळे शिवसेनेला सहानुभूती मिळणार हे उघड होते. तरीही काँग्रेसने चांगली कामगिरी बजावली. नारायण राणे यांनी ताकदीने निवडणूक लढवली पण अपयश आले. तरीही मागील निवडणुकीत 12 हजार मते मिळाली होती ती आता 33 हजार झाली आहेत हे सुद्धा आमचे यशच मानले पाहिजे. या पराभवातून आम्ही नक्की काही बोध घेऊ व पक्ष संघटना आणखी मजबूत कशी करता येईल याचा विचार करू असे चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, या पराभवानंतर नारायण राणे किंवा त्यांच्या कुटुंबियांची कोणतेही अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
नारायण राणेंच्या पराभवानंतर शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.... वाचा पुढे कोण काय-काय म्हणाले...
बातम्या आणखी आहेत...