आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस सरकार नेम चेंजर, 'राजीव गांधी जीवनदायी योजने'वरून अशोक चव्हाणांची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलून महात्मा फुले यांचे नाव देण्यात आले. आपण काही तरी वेगळे करत आहोत, असा भास भाजप-शिवसेना सरकारकडून करण्यात येत असला तरी नाव बदलून या सरकारने वाद निर्माण केला आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या माजी पंतप्रधानाचे नाव बदलण्याच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करणार असून लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून सरकारची ही कृती चुकीची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत. हे सरकार गेम चेंजर नसून नेम चेंजर आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बुधवारी केली.

चव्हाण म्हणाले, काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या योजनांचे नाव बदलण्याचे एकमेव काम या सरकारला करता आले आहे. नवीन योजना सुरू करून फडणवीस सरकारने त्यांना हवे ते नाव द्यावे. आमचा त्याला आक्षेप नाही. राजीव गांधी जीवनदायी योजना आणताना काँग्रेस सरकारच्या काळात हृदय किडनीच्या उपचारासाठी अनुक्रमे 1.50 लाखांची मदत देण्यात येत होती, तर विविध 971 शस्त्रक्रिया सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये होत होत्या. हे सरकार हृदय किडनीच्या आजारासाठी अनुक्रमे लाख रुपये देण्याचे सांगत आहे, तर 971 शस्त्रक्रियांऐवजी ते 1100 शस्त्रक्रियांना मदत करणार आहेत. उपचार निधीच्या रकमेत थोडीफार वाढ केली म्हणजे आपण काही तरी वेगळे करत असल्याचा या सरकारचा भ्रम आहे. मात्र, राज्यातील जनता या नेम चेंजरना त्यांना वेळ येताच नक्की धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुढे स्लाईडद्वारे वाचा, अशोक चव्हाण एकनाथ खडसेंबाबत काय म्हणाले...
गुरुदास कामत यांच्याबाबत काय म्हणाले अशोक चव्हाण...
बातम्या आणखी आहेत...