आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस-मनसे कार्यकर्त्यांत दादरमध्ये जाेरदार हाणामारी; काँग्रेसच्या माेर्चावर मनसेने फेकले बटाटे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेस अाणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते यांच्यात बुधवारी सकाळी दादरमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यामुळे फेरीवाल्यांच्या सन्मानार्थ काढण्यात येणारा काँग्रेसचा मोर्चा बारगळला. दुसरीकडे स्टेशन परिसरात व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना उच्च न्यायालयाने मनाई केल्यामुळे याप्रकरणी मनसेचे बळ वाढले आहे.   

गेले दोन आठवडे मुंबईत फेरीवाल्यांवरून मनसे अाणि काँग्रेस यांच्यात संघर्ष पेटलेला आहे. बुधवारी दादरमध्ये मुंबई काँग्रेसने फेरीवाल्यांच्या सन्मानार्थ एका मोर्चाचे आयोजन केले होते. सकाळी ११ वाजता मोर्चा सुरू झाला. इतक्यात मनसेचे कार्यकर्ते तेथे आले. त्यांनी काँग्रेसच्या मोर्चावर बटाटे फेकण्यास सुरुवात केली. लागलीच दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते भिडले आणि हाणामारी सुरू झाली. गोंधळाची शक्यता असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मनसे कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्ते नितीन पाटील यांची मोटार गाडी फोडली.   काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम मोर्चात सामील नव्हते. 

काँग्रेस खासदार हुसेन दलवाई अाणि माजी खासदार एकनाथ गायकवाड मोर्चाचे नेतृत्व करत होते. राडा होण्याची भीती असल्याने दादरच्या व्यापाऱ्यांनी  दुकाने बंद ठेवली होती.   एल्फिन्स्टन स्टेशन चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर मनसेने मुंबईत फेरीवाल्यांविरोधात मोहीम उघडली आहे, तर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी खासदार संजय िनरुपम फेरीवाल्यांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत.    
 
निरुपम यांना हायकाेर्टाचाही दणका  
मुंबईतील स्टेशन परिसराच्या १५० मीटर क्षेत्रात तसेच शैक्षणिक संस्था, मंदिरे यांच्या १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. मुंबईतील फेरीवाला संघटनांनी कुठेही बसून व्यवसाय करण्याची संमती द्यावी, अशी मुंबई उच्च न्यायालयात विनंती याचिका दाखल केली होती. ती फेटाळून लावत उच्च न्यायालयाने वरील निर्देश िदले. न्यायालयाच्या निर्णयामुळे अनधिकृत फेरीवाल्यांची बाजू घेणारे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनाही दणका बसला अाहे.  
 
फेरीवाल्यांच्या मोर्चात महिलाही 
काही राजकीय पक्षांकडून हाेत असलेला त्रास दूर करावा, व्यवसायासाठी जागा द्यावी यासह इतर मागण्यांसाठी मुंबईतील फेरीवाल्यांनी बुधवारी अाझाद मैदानावर भव्य माेर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले. या वेळी मुंबई, ठाणे आणि उपनगरांतून मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. या माेर्चाला सांभाळताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली. काही तास आंदोलन केल्यानंतर मोर्चेकरी आपापल्या घरी परतले. 
 
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...