आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्यात आघाडी शक्य असली तरी मुंबईत अशक्य- संजय निरुपम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कॉग्रेस मुंबईत स्वबळावर लढणार असल्याचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीचीही तीच भूमिका आहे. म्हणूनच त्यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केले असल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे.

निरुपम म्हणाले, राज्यभरात राष्ट्रवादीसोबत आघाडी शक्य असली, तरी मुंबईत मात्र आघाडी अशक्य आहे. आघाडी होऊ नये, या भूमिकेवर मुंबईतील नेते-कार्यकर्ते ठाम आहेत.

सेना-भाजपने आधी भांडणे मिटवावीत...
निरुपम यांनी भाजप आणि शिवसेनेचे तोंडसुख घेतले आहे. शिवसेना आणि भाजपने आधी आपापसातील वाद दूर करावे. कोण भ्रष्ट? हे आधी ठरवावे, अशा शब्दात निरुपम यांनी टोलाही लगावला आहे.