आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Protest Against Bjp Govt, Made A State Level Rashtra Rokho Agitation

काँग्रेस फडणवीस सरकारविरोधात रस्त्यावर, शेतक-यांच्या प्रश्नावरून केले आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजप-शिवसेनेच्या युती सरकारच्या विरोधात काँग्रेसने आज मुंबईसह राज्यात सर्वत्र रास्ता रोको आंदोलन केले. शेतक-यांना कर्ज माफी, ऊस शेतक-यांना योग्य दर द्यावा याचबरोबर पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी करणे आदी मागण्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्या.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राज्य सरकारवर आरोप करताना म्हटले आहे की, हे सरकार शेतक-यांचे नसून, बड्या बड्या उद्योगपतींसाठी चालविले जात आहे. केंद्र सरकारच्या एका पथकाने दुष्काळी भागाची पाहणी केली आहे. या पथकाने केंद्र सरकारला अहवालही सादर केला आहे. मात्र, केंद्राने शेतक-यांना मदत करण्याचा अद्याप निर्णय घेतला नाही. राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना सरकारने एक रूपयाही न दिल्याने त्यांचा शेती व शेतक-यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन लक्षात येतो असा आरोप ठाकरेंनी केला. शेतक-यांना मदत मिळत नसल्यानेच मराठवाडा व विदर्भातील शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे माणिकरावांनी आरोप केला.
आंतरराष्ट्रीत बाजारात तेलाचे भाव 60 टक्क्यांहून अधिक खाली असतानाही सरकारने केवळ 20 टक्के भाव कमी केले आहेत. पेट्रोल, डिझेल दर एकदा नियंत्रणमुक्त केले असताना देशातील नागरिकांना त्याचा फायदा का देत नाही. सरकारला सामान्यांचे काही देणे-घेणे नसून या पैशातून सरकार आपली तिजोरी भरून घेत आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव कमी केल्यास महागाई कमी होण्यास मदत होईल.
भाजपने व खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा व पाठोपाठ राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकार सामान्यांचा फायदा न करता तेलातून मिळवलेला पैसा दुस-या ठिकाणी वापरत आहे.
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या केंद्रातील व राज्यातील सरकारकडे जनतेच्या विविध समस्यांकडे आणि मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ दिसत नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी दिलेली आश्वासने खोटी ठरली आहेत. जनतेमध्ये विशेषत: शेतकरी, सर्वसामान्य ग्राहक आणि कामगार वर्गात प्रचंड नाराजी व फसवणुकीची भावना आहे. जनतेच्या प्रश्नांकडे भाजप सरकारचे लक्ष वेधण्याकरिता हे आंदोलन पुकारण्यात आल्याचे माणिकराव ठाकरेंनी सांगितले.