आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Put Forward Rathod, Zambad, Lakhe Name For The Local Body Election

कॉंग्रेसकडून स्थानिक स्वराज्य निवडणूकीसाठी राठोड, झांबड,लाखे यांची नावे पुढे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात 19 ऑगस्टला होणा-या निवडणुकीत काँग्रेसकडून सुभाष झांबड, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते प्रमोद राठोड आणि जालना येथील संजय लाखे पाटील यांची नावे पुढे आली आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत या नावांवर चर्चा झाली. यातील एका नावावर शिक्कामोर्तब करण्याचे काम दिल्ली स्तरावर होणार असल्याचे समजते.
या मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशनचंद तनवाणी यांचा कार्यकाळ संपत असून, शिवसेना-भाजपतर्फे या वेळीही तनवाणी यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 1 ऑगस्ट ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून, काँग्रेस उमेदवाराच्या नावावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या बैठकीत चर्चा झाली. तीन नावे समोर आली, परंतु एकावर मतैक्य होऊ शकले नाही. सुभाष झांबड यांनी गेल्या वेळी राष्‍ट्रवादीच्या पाठिंब्यावर या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूकही त्यांनी लढवली होती. त्यांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अब्दुल सत्तार आणि दर्डा यांचे समर्थन आहे. प्रमोद राठोड यांच्या नावाला नारायण राणे यांनी पाठिंबा दिल्याचे समजते.