आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress' Raj Babbar Regrets 'full Meal For Rs 12' Remarks

12 रुपयांत पुरेसे जेवण; वादंग उठल्यानंतर कॉंग्रेसचे प्रवक्ते राज बब्बरांची माफी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'मुंबईत 12 तर दिल्लीमध्ये पाच रुपयांमध्ये पुरेसे जेवण मिळते', असे वक्तव्य करणारे कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि अभिनेते राज बब्बर यांनी अखेर आज (शुक्रवारी) देशातील जनतेची माफी मागितली. बब्बर यांच्या वक्तव्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये वादंग उठले होते. त्यात केंद्रीयमं‍त्री फारुख अब्दुला यांनी एक रुपयात जेवन मिळत असल्याचे सांगून आगीत तेल ओतण्याचे काम केले होते.
बब्बर म्हणाले, 'मी केलेले वक्तव्य दारिद्ररेषेखालील कुंटूंबासाठी होते. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मात्र माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.'
दरम्यान, देशात जेवण स्वस्त झाले असून गरिबी कमी झाल्याच्या दावा सत्ताधारी कॉंग्रेसने केला आहे. यावरुन मुंबईत 12 तर दिल्लीमध्ये पाच रुपयांमध्ये पुरेसे जेवण मिळते, असे राज बब्बर यांनी वक्तव्य केले होते. तसेच एक रुपयात पोटभर जेवू शकता, असे धक्कादायक वक्तव्य करत केंद्रीयमंत्री फारुख अब्दुला यांनी तर गरीब जनतेची चेष्टा केली होती.

मुंबईमध्ये बारा रुपयांत चहा किंवा वडापावसुद्धा मिळत नाही, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते.