आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी सरकारमुळे सणासुदीत लोडशेडिंग, भाजपच्या कारभारावर काँग्रेस नेत्यांचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार काँग्रेसशासित राज्य सरकारांना सहकार्य करत नाही. केंद्राच्या ग्रीडमधून पुरेशी वीज मिळत नसल्यामुळेच गौरी-गणपतीच्या काळातसुद्धा राज्याला नाइलाजाने लोडशेडिंग करावे लागत आहे,’ असा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी केला.

काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
संयुक्त महाराष्ट्राच्या १०५ हुतात्म्यांना अभिवादन करत काँग्रेसने सोमवारी मुंबईतून प्रचाराचे रणशिंग फुंकले. आझाद मैदानावर झालेल्या प्रचारसभेत सर्वच काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारच्या शंभर दिवसांच्या कामाचे वाभाडे काढत अखंड महाराष्ट्रासाठी काँग्रेसच्या हाती पुन्हा एकदा सत्ता सोपवण्याचे आवाहन केले. पावसाचे िदवस असल्यामुळे कार्यक्रमासाठी संपूर्ण आझाद मैदानावर भला मोठा मंडप टाकण्यात आला होता. व्यासपीठावरील पहिल्या रांगेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रचार समितीप्रमुख नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष मािणकराव ठाकरे, मुंबई अध्यक्ष अॅड. जनार्दन चांदूरकर, िवधान परिषदचे सभापती िशवाजीराव देशमुख, मुकुल वासनिक, स्वराज वाल्मीकी, बालाबच्चन आदी पदाधिकारी तसेच नसीम खान, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम आदी होते.

प्रत्येक जिल्ह्यात हुतात्मा ज्योत
संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०५ हुतात्म्यांना अिभवादन करुन ज्योत पेटवण्यात आली. त्या ज्योतीने आझाद मैदानातील महाज्योत प्रज्वलित करण्यात आली. तेथून काँग्रेसच्या सर्व जिल्हाप्रमुखांनी एकएक ज्योत प्रज्वलित करून आपापल्या जिल्ह्यात नेली.

गांधी टोपी अवतरली
काँग्रेसच्या सभांमध्ये गांधी टोपी तशी दुर्मिळ. आम आदमी पक्षामुळे गांधी टोपीला वैभवाचे दिवस आले. आजच्या काँग्रेसच्या कार्यक्रमात मात्र सर्वच नेत्यांच्या डोक्यावर ‘आप’ प्रमाणे गांधी टोपी होती. केवळ ‘आप’च्या जागी तिरंगा होता इतकाच काय तो फरक.

राष्ट्रवादीसोबत आघाडीनेच निवडणुका लढणार : ठाकरे
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत लढवतील. आघाडी होण्यास कोणतीही अडचण नाही. तसेच समविचारी छोट्या पक्षांना सोबत घेण्याचा आमचा िवचार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मािणकराव ठाकरे म्हणाले. भाजपने िनवडणुकीवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना दूर ठेवले होते. मात्र सत्ता येताच मोठ्या पदांवर त्यांची वर्णी लावली जात आहे. हा मतदाराशी िवश्वासघात आहे, असा आरोप करत ‘देशातील पोटनिवडणुकीतले निकाल भाजपच्या िवरोधात गेल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे’, अशी सूचना ठाकरे यांनी केली.
हिंदूंमध्ये फुटीचा भाजपचा डाव : अशोक चव्हाण
‘सत्तेसाठी समाजात आणि राज्यात फूट पाडण्याचा भाजपचा डाव आहे. त्यांनी आधी दोन धर्मांमध्ये भांडणे लावली. आता ते हिंदू समाजातही फूट पाडू पाहत आहेत. देशातील सर्व जाती-धर्मांमध्ये श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांबद्दल धर्मसंसदेच्या माध्यमातून अवमानजनक वधिान केले गेले, हादेखील त्यांच्या कटाचा भाग आहे. अशा लोकांना महाराष्ट्रातील जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही,’ असे माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण म्हणाले. वरुणराजाने उशिरा का होईना पुरेशी हजेरी लावली आहे. त्यामुळे आगामी िनवडणूक काँग्रेसला सोपी जाईल, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली.
काँग्रेस पुन्हा उभी राहील : सुशीलकुमार शिंदे
मी सहा वर्षे केंद्रीय ऊर्जा मंत्री होतो. आम्ही पक्षीय भेदाभेद बाजूला सारून सर्वच राज्यांना विजेचे समायोजन करायचो. मात्र मोदी सरकार विजेच्या समायोजनात नापास ठरले असून आज दिल्लीमध्येसुद्धा वीज मिळत नाही, असा आरोप सुशीलकुमार शिंदे यांनी केला. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात विकास दर ९ टक्के होता. आज तो दर ५ टक्के आहे. तरीही मोदी सरकार विकासाची िटमकी वाजवत असल्याचे ते म्हणाले. लोकसभेतील पराभवातून काँग्रेस पुन्हा उभी राहील हे सांगण्यासाठी "वारा खात, गारा खात बाभूळझाड उभेच आहे' या कवितेच्या ओळी शिंदे यांनी ऐकवल्या.

मोदींच्या प्रसिद्धीसाठी उधळपट्टी : मुख्यमंत्री
ज्या राज्यांकडे अधिक वीज आहे, त्यांची वीज इतर राज्यांना पुरवणे केंद्राचे काम आहे. आम्ही मागणी केली. पण मोदी सरकार त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे. केंद्रामुळे देशात विजेचे गंभीर संकट िनर्माण झाल्याचा आरोपही मुख्यमंत्री चव्हाण यांनी केला. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी एकाधिकारशाहीने कारभार केला. त्याच एकाधिकारशाहीने ते केंद्रात कारभार करत आहेत. मोदी स्वत: ची प्रसिद्धी करण्यासाठी सार्वजनिक पैशाचा मोठा अपव्यय करत आहेत, असा अाराेप करत देशात आजही महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य असल्याचा पृथ्वीराज चव्हाण यांनी पुनरुच्चार केला. तसेच १०० मेट्रो शहरे विकसित करण्यासाठी केवळ ७ हजार कोटींची तरतूद केल्याबद्दल मोदी सरकारची चव्हाण यांनी खिल्ली उडवली.

स्वतंत्र विदर्भाची मागणी फेटाळली
तेलंगण राज्याची िनर्मिती करणाऱ्या काँग्रेसने स्वतंत्र विदर्भाबद्दल मात्र अाजवर तळ्यात-मळ्यात भूमिका घेतली होती. सोमवारी प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी मात्र त्यांनी ही मागणी साफ फेटाळून लावत महाराष्ट्र अखंड ठेवण्याची ग्वाही िदली. राेहयाे मंत्री िनतीन राऊत, माजी खासदार िवलास मुत्तेमवार यांच्यासह िवदर्भातील अनेक नेत्यांनी स्वतंत्र राज्याची अाग्रही मागणी केलेली असतानाच पक्षानेही ही भूमिका घेतल्याने िनवडणुकीच्या ताेंडावर काॅंग्रेसमध्ये दुफळी िनर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा भाजपचा छुपा अजेंडा आहे. अखंड महाराष्ट्र ठेवायचा असेल, राज्यातील जातीयवाद रोखायचा असेल तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवा, असे आवाहन नारायण राणे यांनी केले.

अखंड महाराष्ट्रासाठी भाजपला दूर ठेवा : नारायण राणे
महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा भाजपचा छुपा अजेंडा आहे. अखंड महाराष्ट्र ठेवायचा असेल, राज्यातील जातीयवाद रोखायचा असेल तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवा, असे भावनिक आवाहन काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी केले. देशाचा, राज्याचा जो आज विकास िदसतो आहे त्याचे श्रेय काँग्रेसला जाते, असे सांगत ‘िवरोधकांना सत्ता कशाशी खातात याची मािहती नसताना सर्वजण मुख्यमंत्रिपदाचे बाशिंग बांधून बसले आहेत’, असा टोला राणे यांनी लगावला. मागील १५ वर्षात अाघाडीने मुंबईची वाट लावली असा आरोप करणारा भाजपने गेल्या शंभर िदवसांत मोदी सरकारने काय केले, महागाई कमी केली का? असा प्रश्न राणेंनी केला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनो पेटून उठा, भाजपविषयी तुमच्या मनात चीड िनर्माण करा, अशा आक्रमक भाषणाने राणे यांनी कार्यक्रमात जाण आणली.