आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Rethink On Aadarsh Report After Rahul Statement

\'आदर्श\'चा अहवाल पृथ्वीबाबा स्वीकारणार, अशोक चव्हाणांना वाचविण्यासाठी समिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील आदर्श सोसायटी घोटाळ्याचा अहवाल फेटाळण्याच्या निर्णयाबाबत फेरविचार करू, असे प्रदेश काँग्रेसने म्हटले आहे. तसेच उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सर्वच सूचनांचे पालन पक्ष करील अशी बोलकी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान, आदर्श अहवाल फेटाळल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा देण्याची गरज नाही. हा कॅबिनेटने घेतलेला निर्णय होता व पुन्हा कॅबिनेटमध्ये याबाबत फेरविचार होईल असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने व चार राज्यात सपाटून मार खाल्याने राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे चित्र आहे. तसेच भविष्यातही राहुल याच मार्गाचा अवलंब करणार असल्याने पक्षातील दागी नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. याचबरोबर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजकीय वनवास आणखी काही काळ पुढे गेल्याचे स्पष्ट होत आहे.
काँग्रेसमधील निर्णय प्रक्रिया केंद्र सोनियांकडून राहुलकडे?- राहुल गांधी यांनी मागील काही दिवसात घेतलेल्या भूमिकेमुळे व निर्णयामुळे काँग्रेसमधील सत्ताकेंद्र व निर्णय प्रक्रिया केंद्र बदलल्याचे दिसते. राष्ट्रीय पातळीवर रूढ राजकारणाला धक्के देणारे निर्णय पक्षाध्यक्षा सोनिया गांधी घेत नसून उपाध्यक्ष राहुल गांधी घेत आहेत हे स्पष्ट होत आहे. तसेच अशा निर्णयाची प्रक्रिया राहुल ब्रिगेडमधून सुरु होत असून त्यावर राहुल निर्णायक घाव घालत असल्याचे दिसून येते. गुन्हेगारी खटल्यात दोषी ठरलेल्या नेत्यांना निवडणूक लढविण्याची मुभा देण्याचा केंद्राचा निर्णय जुलै महिन्यात सुप्रीम कोर्टाने रद्द केला होता त्यावर कोर्टाने निर्णय फिरवावा यासाठी केंद्र सरकारने चक्क वटहुकुम काढला होता. यावेळी पहिला आक्षेप मिलिंद देवरा यांनी टि्वटरवर घेतला होता. त्यानंतर हा वटहुकूम म्हणजे नॉनसेन्स असून तो फाडून टाकण्याच्या लायकीचा आहे असे सांगत पक्षातील निर्णय प्रक्रियेत ढवळाढवळ करणा-या प्रस्थापित नेत्यांना दणका दिला होता.
अहवाल स्वीकारून काँग्रेस पुन्हा तज्ज्ञ समिती नेमणार, वाचा पुढे...