आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Send Hussain Dalwai & Murli Deora In Rajyasabha Once Again

राज्यसभेसाठी काँग्रेसकडून हुसेन दलवाई व मुरली देवरांना पुन्हा संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या 7 फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. कारण 7 जागेसाठी आतापर्यंत सात जणच इच्छुक असून, काँग्रेसने खासदार हुसेन दलवाई व मुरली देवरा पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. दलवाई यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत काँग्रेसमधून मिळत होते पण आजारपणामुळे मुरली देवरा यांच्याऐवजी दुसरा कोणीतरी उमेदवार दिला जाण्याची शक्यता होती मात्र काँग्रेसने आपल्याच जुन्याच खासदारांना पुन्हा संसदेत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
दलवाई व देवरा उद्या अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातून भाजपच्या कोट्यातून रामदास आटवले यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे याबाबतची घोषणा दिल्लीत आज सायंकाळी होण्याची शक्यता आहे. आठवले सु्द्धा उद्याच अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष शरद पवार, अॅड. माजिद मेमन तर शिवसेनेकडून उद्योगपती राजकुमार धूत यांनी अर्ज दाखल केला आहे. सातव्या जागेसाठी कोणत्याही पक्षाकडे बहुमत नसल्याने अपक्ष अर्ज दाखल केलेले संजय काकडे राज्यसभेत पोहचण्याची शक्यता आहे.
पुढे वाचा, बिनविरोध होणार निवडणूक...