आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Should Get Rahul Gandhi Married Instead Of Attacking Narendra Modi: Shiv Sena

काँग्रेसने मोदींऐवजी राहुल यांच्या लग्नाची चिंता करावी : शिवसेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये लग्नाच्या वादात नरेंद्र मोदी यांचा बचाव केला आहे. याबरोबर कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. कॉँग्रेसच्या राजकीय गुंड आणि नेत्यांनी आतापर्यंत महिलांना फसवून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.

लग्न आणि पदाची लालूच देऊन फसवले जातेय. कॉँग्रेसचे अनेक नेते बलात्कार आणि महिलांवरील अत्याचार प्रकरणात तुरुंगात आहेत. दुसरीकडे कॉँग्रेसवाले नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पत्नी जसोदाबेन यांच्यावर झालेल्या कथित अन्यायाविरोधात उभे राहिले आहेत. त्यांनी मोदींऐवजी राहुल गांधी यांच्या लग्नाची चिंता करावी, असे अग्रलेखात नमूद केले आहे. मूर्ख माणसे आपल्या चुका झाकत राहतात आणि त्यांना त्या दुसर्‍यांच्या दाखवण्यात अभिमान वाटतो. काँग्रेसला जसोदाबेन यांच्या मुद्द्यावर एवढीच चिंता असेल तर शशी थररूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्करच्या गुढ मृत्यूबाबतही त्यांनी काही बोलले पाहिजे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.