Home »Maharashtra »Mumbai» Congress Slams Raj Thackeray Over Crime Rate Jibe

राज यांनी कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवावे : सावंत

प्रतिनिधी | Jan 07, 2013, 04:09 AM IST

  • राज यांनी कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवावे : सावंत

मुंबई - बलात्काराच्या घटनांसाठी एखाद्या विशिष्ट राज्याला जबाबदार धरण्यापेक्षा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षातील कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवले तर राज्यातील गुन्हेगारी कमी होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे. दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणांतील गुन्हेगार बिहारी असून त्यांच्यामुळेच गुन्हे वाढत असल्याचे विधान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कोकण ग्लोबल महोत्सवात बोलताना केले होते. राज यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने टीकेची झोड उठवली आहे.अनेक संवेदनशील विषयांवर त्यांनी अनेकदा अत्यंत बेजबाबदार वक्तव्ये करून आपली उथळ मानसिकता दाखवली असल्याचे परखड मतही सावंत यांनी व्यक्त केले.

बलात्कारासारख्या अप्रिय घटना घडत असताना समाजातील सर्व स्तरातील लोकांनी एकत्र येऊन याचा मुकाबला केला पाहिजे, अशा घटनांचे राजकीय भांडवल करू नये, असे सांगताना मनसे यांच्या कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवले तरी या घटना कमी होतील. गेल्या महिन्यांत मनसेच्या वाहतूक सेनेच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

बलात्कार प्रकरणात मनसे कार्यकर्ते - अंधेरी येथे घरकाम करणा-या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मनसेच्या चार जणांनाही अटक करण्यात आली आहे, तर कल्याण येथे मनसेच्या नगरसेवकाने वयोवृद्ध कंत्राटदाराला मारहाण केल्याची घटना ताजी आहे, खंडणी आणि मारहाणीच्या घटनांमध्ये मनसे आघाडीवर असल्याचे नेहमीच दिसून आल्याचे सावंत यांनी सांगितले. लोकांसमोर जाण्यास कोणतेही मुद्दे शिल्लक नसल्याने आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी गैरप्रकार दुर्लक्षित करून जनतेचे लक्ष इतर मुद्द्यांकडे वळवण्याचा राज यांचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोपही सावंत यांनी केला आहे.

Next Article

Recommended