आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Congress State President Manikrao Thakre Gives Signal To Not Tie up With Ncp

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चर्चेची वेळ निघून गेली, माणिकराव ठाकरेंच्या वक्तव्यामुळे आघाडी तुटल्याचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आघाडीच्या जागावाटपाबाबत करावयाच्या चर्चेची वेळ आता निघून गेली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, माणिकराव ठाकरे यांचे हे वक्तव्य म्हणजे आघाडी तुटल्याचेच स्पष्ट संकेत देत आहे.
काँग्रेस पक्ष आज सायंकाळी आपली दुसरी यादी जाहीर करेल असेही ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादीनेही आघाडी तुटल्यातच जमा आहे असे गृहित धरून तयारी सुरु केली आहे. शरद पवारांच्या आदेशानुसार पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल दिल्लीतील काँग्रेस नेत्यांना भेटायला जाणार होते. मात्र, पटेल यांनीही दिल्लीला जाणे रद्द केले आहे. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. यात राष्ट्रवादी आपली पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. यावेळी आघाडीबाबत राष्ट्रवादी काय भूमिका मांडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.