आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress State Spokeperson Ratnakar Mahajan Attack On Sharad Pawar

...मग शरद पवारांनी खंबीर इंदिरांविरूदध बंड का पुकारले?, काँग्रेसचा प्रतिहल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जनतेला दुबळे राज्यकर्ते आवडत नाहीत अशी टीका करायची नंतर खंबीर नेतृत्त्व म्हणून इंदिरा गांधींचे कौतूक करायचे मग याच सामर्थ्यवान अशा इंदिरांसारख्या नेत्याविरोधात बंड का केले होते, असा प्रतिहल्ला काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकार महाजन यांनी शरद पवारांवर चढविला आहे. दोन दिवसापूर्वी इंदिरा गांधी यांच्यासारख्या कणखर नेतृत्त्वाची गरज असल्याचे शरद पवारांनी आपल्या ब्लॉगद्वारे मत व्यक्त केले होते. चार राज्यात काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर पवारांनी केलेल्या भाष्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्याचा आज अनुभवी व जुनेजानते असे काँग्रेसचे प्रवक्ते महाजन यांना समाचार घेतला.
महाजन म्हणाले, ज्या नेत्यांच्या सामर्थ्यांची भुरळ पवारांना आता पडली आहे त्यांच्यातविरोधात आपण बंड केले होते हे जनता विसरलेली नाही. जर पवारांना इंदिरांचे नेतृत्त्व खंबीर आणि कणखर वाटत होते तर 1978 साली त्यांनी इंदिरांविरोधात बंड का केले होते. तसेच त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ते राज्यभर इंदिराच्या विरोधात भाषणे देत का फिरत होते, याची आठवण जुन्या-जानत्यांना आजही आहे. त्यामुळे पवारांनी उगाच काहीतरी करण्याच्या नादात काहीही उठसूट सांगू नये.

पुढे वाचा, महाजन यांनीही दिली आहे शरद पवारांना साथ....