आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आघाडीत बिघाडीः काँग्रेसला पवारांची टीका झोंबली, कुरबुरी थांबता थांबेनात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये केलेली अप्रत्यक्ष टीका काँग्रेसला चांगलीच झोंबली असून पवारही या सरकारचाच घटक असल्याची आठवण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी रविवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना करून दिली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेली धुसफुस पुन्हा एकद समोर आली.
केंद्रात आणि राज्यामध्ये काँग्रेसप्रणीत सरकार चांगले चालले आहे. चांगले निर्णयही होत आहेत. अशा वेळी एखादा विकासाचा निर्णय घेताना पवारांचे काही वेगळे मत असू शकते. तेही या सरकारचा घटक असल्याने आपले मत थेट नोंदवू शकतात, अशी प्रतिक्रिया माणिकराव यांनी बोलताना दिली. पवार यांनी शनिवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमामध्ये केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा कायद्याबाबत शंका उपस्थित केली. तसेच महाराष्ट्रातील उद्योग बाहेर चालले असून हे लक्षण बरे नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले. टीका होते म्हणून निर्णय न घेण्याच्या सरकारी धोरणावरही पवारांनी ताशेरे ओढले आणि निर्णय घेण्याचे धाडस करावे लागते,
अशी टोला लगावला.
पवारांच्या या टीकेने काँग्रेसमध्ये पुन्हा अस्वस्थता पसरली असून आता राष्ट्रवादीवर पलटवार करण्यासाठी काँग्रेसचे नेते रणनीती आखू लागले आहेत. याआधी मुख्यमंत्र्यांनी सिंचनाच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत या प्रश्नी श्वेतपत्रिका काढवी, असे सांगितले होते. पण सिंचनाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी आक्रमक झाल्याने मुख्यमंत्र्यांना गप्प बसावे लागले. पवारांनीही सिंचनाच्या प्रश्नी मुख्यमंत्र्यांची अप्रत्यक्षपणे कानउघाडणी केली. 2014 च्या विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. कधी स्वबळावर लढण्याची भाषा, तर कधी एकमेकांवर टीका. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्था, विधान परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला यश मिळाल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. आगामी काळात दोन्ही पक्ष काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील निर्णयप्रकिया ठप्प- शरद पवारांचे मुख्यमंत्र्यावर पुन्हा शरसंधान
‘दादांचा आदर्श ठेवा’; परदेशवारीवरून शरद पवारांनी उपटले नेत्यांचे कान
महिलांचा जनाधार वाढवा, शरद पवार यांचे पदाधिका-यांना आवाहन