आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Vice President Rahul Gandhi Rally In Mumbai

राहुल यांच्‍या पदयात्रेत हजारो कार्यकर्ते सहभागी, ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्‍त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई दौ-यातील दुस-या दिवशी शनिवारी काँग्रेसचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांच्‍या उपस्‍थितीत कार्यकर्त्‍यांनी पदयात्रा काढली. वांद्रेवरून धारावीच्‍या दिशेने हजारो कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले. मुंबईमध्ये वीजदर स्वस्त व्हावेत यासाठी काँग्रेसने पदयात्रा काढली.
पोलिसांचा तगडा बंदोबस्‍त
- काँग्रेसचे माजी नेता सुनील दत्‍त यांना श्रद्धांजली अर्पण करून पदयात्रेला सुरूवात.
- पदयात्रेत प्रिया दत्त, संजय निरूपम यांच्‍यासह काँग्रेसचे अनेक नेते सहभागी झाले.
- वांद्रे ते धारावी पदयात्रेचा मार्ग हजारो काँग्रेस कार्यकर्त्‍यांनी फुलून निघाला.
- धारावीत सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती.
- पदयात्रेच्‍या मार्गावर ठिकठीकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्‍त होता.
- राहुल गांधी यांनी धारावीमध्ये लघुउद्योजकांना भेटी दिल्या.
- विविध क्षेत्रातील लघुउद्योजकांशी त्यांनी संवाद साधला.
- तूरडाळीचे भाव कमी का होत नाहीत याचे उत्तर सरकारने द्यावे. - राहुल यांची मागणी .
एनएमआयएमएस कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी संवाद
- राहुल यांनी शनिवारी सकाळी एनएमआयएमएस कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
- विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली.
- काँग्रेसचा जीएसटी विधेयकाला विरोध नाही, भाजपातच मतभेद असल्‍याचे ते म्‍हणाले.
- जीएसटीमुळे नागरिकांवर कराचा अधिक बोजा पडू नये असे आम्हाला वाटते- राहुल.
- विधेयकात आम्ही सांगितलेले बदल दुरूस्ती करण्यास भाजपाचा विरोध आहे. - राहुल.
- राहुल यांनी असहिष्णूतेच्या मुद्यावरूनही सरकारवर निशाणा साधला.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, पदयात्रेचे फोटो...