आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Consider Changes In The Rules On Parole Says Maharashtra Homeminister Rr Patil

पॅरोलचे नियम होणार कडक; जेवढे दिवस बाहेर, तेवढ्या दिवसांची अतिरिक्त शिक्षा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता संजय दत्तला एका वर्षात तीन वेळा पॅरोल मिळाल्याने केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाकडून अहवाल मागविला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राज्य सरकार पॅरोलचे नियम आणखी कडक करण्याचा विचार करीत असल्याचे म्हटले आहे. संजय दत्तला 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटादरम्यान अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा झाली आहे. पॅरोलवर बाहेर असलेला संजय दत्तची रवानगी येरवाडा तुरुंगात आहे.
46 महिन्यांची शिक्षा शिल्लक
संजय दत्तची जवळपास 46 महिन्यांची शिक्षा बाकी आहे. त्याची रवानगी पुण्याच्या येरवाडा तुरुंगात आहे मात्र, आता पर्यंत तीन वेळा त्याची पॅरोलवर सुटका झाली आहे. प्रत्येकवेळी त्यांने पत्नी मान्यताच्या आजारपणाचे कारण सांगितले आहे. यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारने राज्य सरकारकडून त्याच्या शिक्षेचा अहवाल मागविला आहे. कोणत्या आधारावर संजय दत्तला तीन-तीन वेळा पॅरोल मिळत आहे, याची विचारणा केंद्राने केली आहे.
असे होणार बदल
या प्रकरणी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सांगितले, राज्य सरकार पॅरोलच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करणार आहे. याची माहिती केंद्रालाही कळविली जाईल. यापुढे कोणताही कैदी पॅरोलवर बाहेर आला तर, त्याला तेवढ्या दिवसांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. कोर्टाने जेवढ्या दिवसांची शिक्षा सुनावली असेल तेवढ्या दिवसांची शिक्षा त्याला पूर्ण करावीच लागेल.
तुरुंग प्रशासनसोबत या संबंधीची चर्चा झाली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांना अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या राज्य आणि केंद्र सरकारचे पॅरोलसंबंधीचे नियम सारखे आहेत. मात्र, नियमांमध्ये बदल करण्याचा अधिकार राज्याला आहे.