आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह, सेक्स और धोका : प्रियकराबरोबर भांडणानंतर तिने रचला असा कट की तो अडकला गुन्ह्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- प्रेम आणि धोका या एकाच नाण्याच्या दोन बाजु असल्याचे एका गुन्ह्याची उकल करताना मुंबई पोलिसांच्या समोर आले. या प्रकरणातील दुसरी बाजु समजल्यावर पोलिसही चक्रावले. चारकोप येथे एका धावत्या कारमध्ये आपल्यावर बलात्कार झाल्याची फिर्याद एका मुलीने दिली होती. पोलिस या घटनेचा तपास करताना एका रिक्षाचालकापर्यंत पोहचले. त्यानंतर या मुलीने आपल्या प्रियकराला फसविण्यासाठी हा बनाव रचल्याचे उघड झाले.
 
मुलीवर खोटी फिर्याद दिल्याने होणार गुन्हा दाखल
पोलिस आता या प्रकरणाचा तपास बंद करुन मुलीविरुध्द गुन्हा दाखल करणार आहेत. या मुलीने बलात्काराची फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी या भागातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले पण त्यांना अशी कोणतीच कार दिसली नाही. त्यामुळे पोलिसांनी या मुलीने त्यादिवशी नेमके काय केले याचा तपास केला. तपास करताना ते एका रिक्षाचालकापर्यंत पोहचले. या रिक्षाचालकाने ही मुलगी त्यादिवशी मार्वे बीचवर असल्याचे सांगितले. पोलिस एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्या दिवशीचे तिचे लोकेशनही तपासले. ती मार्वे बीचवरच होती हे स्पष्ट झाले. तिने आपल्यावर अक्स बीचवर बलात्कार करुन काही जणांनी आपल्याला हात-पाय बांधून तिथेच फेकल्याचे सांगितले होते. पोलिसांनी तिची कसून चौकशी केल्यावर तिने आपण खोटी फिर्याद दिल्याचे मान्य केले.

का रचला कट?
या मुलीचे आपल्या प्रियकराबरोबर भांडण झाले होते. यावेळी तिच्या प्रियकराने तिच्या आईबद्दल अपशब्द वापरले. या मुलीच्या मनात हा राग होता. तिने त्यानंतर प्रियकराला अडकविण्यासाठी हा कट रचला. एका गुन्हेगारीविषयक मालिकेतुन तिला यासाठी प्रेरणा मिळाली. मुंबईच्या पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी हा प्रकरणाचा तपास लवकरच बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...