आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-एसबीटीआरद्वारे ग्राहकांना मिळणार दिलासा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विविध कारणांसाठी मुद्रांक शुल्क भरावे लागणा-या ग्राहकांना आता अधिक सोप्या आणि कमी खर्चीक पद्धतीचा वापर करता यावा यासाठी राज्य सरकारने ई-एसबीटीआरही ही नवीन संगणकीय कार्यप्रणाली लागू करण्यास बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. यामुळे मुद्रांक शुल्काच्या कमिशनपोटी अव्वाच्या सव्वा रक्कम भराव्या लागणा-या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, दस्त नोंदणी करण्यासाठी सेवाशुल्क इत्यादी शासनाकडे जमा करण्यासाठी प्रचलित कार्यपद्धतीनुसार नागरिकांना वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करावा लागतो.मात्र, सरकारने लागू केलेली ई-एसबीटीआर ही कार्यप्रणाली ही प्रचलित पद्धतीपेक्षा सर्वाधिक सुरक्षित असून यामुळे शासनाच्या कमिशन खर्चातही बचत होणार असल्याचा दावा सरकारने केला आहे. या पद्धतीमुळे रोख रक्कम हाताळणे, डी. डी. अथवा पे ऑर्डरद्वारे रक्कम शासनाकडे भरून त्यांच्याकडून मुद्रांक प्राप्त करून घेणे आदी कामे करून घ्यावी लागत होती.
प्रचलित मुद्रांक शुल्क भरण्याच्या पद्धतीबरोबरच ई-एसबीटीआर या नवीन प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रणालीत मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, दस्त नोंदणी करण्यासाठी सेवाशुल्क या विविध बाबींद्वारे शासनाकडे जमा होणारी महसुली रक्कम स्वीकारल्यानंतर ग्राहकाला ई-एसबीटीआरची साधी पावती देण्यात येणार आहे. संबंधित बँकांना कोणतीही रक्कम द्यावी लागणार नाही.