आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Contempt Of Court Petition Filed Against Raj Thackerey

शिवाजी पार्कप्रकरणी राज ठाकरेंविरोधात हायकोर्टात अवमान याचिका दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः शिवाजी पार्कबाबत उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयाविरोधात मत प्रदर्शन आणि शेरेबाजी केल्‍यावरुन महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांच्‍याविरोधात अवमान याचिका दाखल करण्‍यात आली आहे. महापालिका निवडणुकीदरम्‍यान मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे जाहीर सभेस नकार देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल ही अवमान याचिका आहे. राज्याच्या महाधिवक्त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर ही याचिका दाखल केली गेली. लवकरच ती सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे. अड. एजाज नक्वी यांनी ही याचिका दाखल केली आहे.
न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी राज यांच्यावर कारवाई करुन त्यांना शिक्षा सुनावण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. पालिका निवडणुकीदरम्‍यान प्रचार सभा घेण्‍यासाठी राज ठाकरे यांनी परवानगी मागितली होती. परंतु, शांतता क्षेत्राचा नियम दाखवित महापालिकेने परवानगी दिली नाही. त्‍याविरोधात राज ठाकरेंनी उच्‍च न्‍यायालयात धाव घेतली होती. परंतु, न्‍यायालयाने त्‍यांच्‍या विरोधात निकाल दिला. शिवाजी पार्क हे शांतता क्षेत्रात आहे. एका राजकीय पक्षाला परवानगी दिली तर सगळ्यांनाच द्यावी लागेल, असे स्पष्ट करुन न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालयाचा हा निर्णय पक्षपाती असल्याची शेरेबाजी केली होती. न्‍यायालयाने कायद्याच्‍या चौकटीतच राहून निर्णय द्यावा, असे वक्तव्‍य केले होते.
हायकोर्टाचा निकाल कायद्यात न बसणारा - राज ठाकरे
शिवाजी पार्कचे रामायण
शिवाजी पार्कसाठी नियम शिथील करण्‍याची केंद्राला विनंती