आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Controll Of Money On Sahara Group Chairman Subrato Roy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहारा ग्रुपचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या संपत्तीवर टाच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बाजार नियामक सेबीने सहारा समूहातील दोन कंपन्यांची बँक खाती गोठवली आहेत. यात समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय आणि वरिष्ठ अधिका-यांच्या बँक खात्यांचा समावेश आहे. गुंतवणूकदारांचे 24 हजार कोटी रुपये परत न केल्यामुळे सेबीने ही कारवाई केली आहे. सुब्रतो रॉय यांची सर्व स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही दिले आहेत.

तत्पूर्वी, या कंपन्यांविरुद्ध अद्याप कारवाई न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायलयाने 6 फेब्रुवारी रोजी सेबीची कानउघाडणी केली होती. न्यायमूर्ती के.एस. राधाकृष्णन आणि जे.एस. खेहर यांच्या पीठाने म्हटले होते की, सहारा समूहातील दोन कंपन्या आपल्या आदेशांचे पालन करत नाहीत. अशा वेळी त्यांची मालमत्ता जप्त करणे आणि बँक खाती गोठवण्यासाठी सेबीला मोकळीक आहे. आपल्याविरुद्ध अवमान कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणाही
पीठाने कंपन्यांना नोटीस पाठवून केली होती. उत्तर देण्यासाठी सहारा समूहाला चार आठवड्यांचा अवधी देण्यात आला होता.

सहारा समूहाचा दावा
गुंतवणूकदारांना 19,400 कोटी रुपये आधीच देण्यात आले आहेत, असा सहारा ग्रुपचा दावा आहे. 5,120 कोटी रुपये देण्याचा प्रश्न आहे, तेव्हा यातील 2,620 कोटी रुपयेच गुंतवणूकदारांना द्यायचे आहेत.
प्रकरण काय
* गुंतवणूकदारांकडून जमा केलेले 24 हजार कोटी रुपये परत करण्याचा आदेश सर्वोच्च् न्यायालयाने 31 ऑगस्ट 2012 रोजी सहाराच्या 2 कंपन्यांना दिला होता. शिवाय 15% व्याज देण्याचेही म्हटले होते. 3 महिन्यांची मुदत दिली होती.
* जून 2011 मध्ये सेबीने गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश सहाराला दिले होते. याविरुद्ध सहाराने सॅटकडे अपील केले. सॅटने सेबीचा आदेश कायम ठेवला. त्याविरुद्ध सहारा ग्रुप सुप्रीम कोर्टात गेला.
* समूहाच्या दोन कंपन्यांमध्ये सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन आणि सहारा हाउसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचा समावेश आहे. या कंपन्यांनी 2.30 कोटी छोट्या गुंतवणूकदारांकडून ही रक्कम 2008 ते 2011च्या दरम्यान परिवर्तनशील डिबेंचरच्या माध्यमातून जमवली होती.
* डिसेंबर 2012 मध्ये न्यायालयाने ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये परत करण्याची सवलत सहाराला दिली. पैकी 5,120 कोटी त्वरित द्यायचे होते. तर 10 हजार कोटीचा पहिला हप्ता यंदा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात द्यायचा होता.
* समूहाने उरलेले दोन हप्ते दिलेले नाहीत, असे सेबीने बुधवारी म्हटले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बँक खाती गोठवणे आणि समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेवर टाच आणावी लागली.