आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कधीकाळी होते Restaurant मध्ये cook; आज आहेत जगभरात 450 Hotels

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/पुणे- लेखक, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरण तसच पक्षीविद्यातज्ज्ञ,आणि पुरातन वस्तुंचे अभ्यासक, असणारे चतुर्रस्त्र व्यक्तिमत्व म्हणजे विठ्ठल व्यंकटेश कामत हे होय.

विठ्ठल कामत यांच नाव घेताच  “सत्कार“, “ऑर्कीड” आणि “सम्राट” सारखी विविध खाद्यसंस्कृतींनी परिपूर्ण अशी उपहारगृहे डोळ्यासमोर उभी राहतात.

 

 

मराठी माणसांना उद्योगासाठी प्रेरणा मिळेल अशीच या मराठी उद्योजकाची ख्याती आणि किर्ती आहे. यासाठी अपार मेहनत,  जिद्द, कल्पकता, उद्दमशीलता, तसच वेळप्रसंगी जबाबदारी घेण्याची वृत्ती आणि तयारी असावी हे विठ्ठल कामतांकडून निश्चितच शिकता येण्यासारखे गुण आहेत.

 

प्रयोगशील आणि अफाट कल्पना शक्ती लाभलेल्या विठ्ठल कामतांनी अतिशय नियोजनपूर्णतेनं उपहारगृह या संकल्पनेत अमूलाग्र बदल घडवून आणलेत आणि भारतीय उपहारगृहांना आधुनिक दर्जा देण्याचं श्रेय हे विठ्ठल कामतना जातं. कारण त्यांनी राबवलेल्या संकल्पनांना, आधुनिकतेसोबतच परंपरागत, आदरातिथ्याची उद्योगशीलतेची जोड होती.

 

हॉटेल उद्योग व्यतिरिक्त विठ्ठल कामतांनी पर्यावरणाला फायदेशीर ठरेल अशा अनेक प्रकल्पांची उभारणी केली आहे. हे विश्व, ही सृष्टी सदा हिरवळ आणि झाडा-झुडूपांनी तसंच प्राण्यांनी समृद्ध असावी असा त्यांचा मानस आहे. यासाठी “पाथरे गांव” सारख्या डोंगराळ भागात औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. मुंबईतील अनेक उद्यान दत्तक घेत शहर प्रदूषण विरहित बनवणं, आणि उल्लेख करावा अशा “फुलपाखरु उद्यानाची” समावेश करता येईल.

 

“हरीण”, “कासव”, आणि दुर्मिळ पक्ष्यांचं संवर्धन होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत. तसंच ओडिशा येथील “चिलिका तलाव” येथे “डॉल्फीन ऑबझर्वेटरी सेंटर” ची स्थापना करण्यात आली आहे. त्याशिवाय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ऑर्कीड हॉटेल च्या परिसरामध्ये “राघु” आणि “चिऊ गल्ली” ची  भारणी करुन वातावरणात अधिकाधिक नैसर्गिकता आणली आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...