आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cooperative Sugar Factories Not Sick, But Focibly Fall Anna Hazare

राज्यातील सहकारी साखर कारखाने आजारी पडले नाहीत, तर पाडण्यात आले -अण्‍णा हजारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील सहकारी साखर कारखाने आजारी पडले नाहीत, तर पाडण्यात आले. 40 साखर कारखान्यांच्या विक्रीत 10 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी केला. या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करतानाच अण्णांनी सरकारला त्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. तसे झाले नाही तर जेल भरो आंदोलन करण्याचा इशाराही अण्णांनी या वेळी दिला.


कारखान्यांची विक्री थांबवण्याच्या मागणीसाठी राज्य राष्‍ट्रीय साखर कामगार फेडरेशनच्या वतीने आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या वेळी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची उपस्थिती होती. या सभेत अण्णांनी आरपारच्या लढाईचे रणशिंग फुंकले. मोर्चाच्या शिष्टमंडळाने सायंकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली.


अण्णांचे खडे बोल
* अर्ध्या मंत्रिमंडळाचे हात बरबटले आहेत. तथाकथित साखरसम्राटांचा लालूप्रसाद यादव होईल.
* कारखाने जाणीवपूर्वक आजारी पाडण्यामागे सत्ताधारी व विरोधकांचे रॅकेट आहे. त्यांच्याविरोधातील ही लढाई मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे.
* आजारी कारखान्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्राने तुतेजा समिती नेमली. राज्याने एकही प्रस्ताव दिला नाही.
* शासनाच्या चौकशी समित्या फार्स असतात. न्यायालयीन चौकशी केली तरच सत्य बाहेर येईल. या दरोडेखोरांच्या विरोधातील लढाईत सर्वांनी उतरावे.


न्यायालयीन चौकशी नाही
कारखान्याच्या अवैध विक्री व्यवहार प्रकरणी सहकार कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अण्णांसोबतच्या शिष्टमंडळाला दिले. याप्रकरणी 15 दिवसांनी आढावा बैठक होणार आहे. या बैठकीनंतर जेल भरो आंदोलनाचा निर्णय जाहीर करू, अशी माहिती अण्णांनी दिली.