आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cop Suspended For Obscene Remarks On Rape Survivors Inner Wear

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बलात्कार पीडितेच्या अंतरवस्त्रावर अश्लिल कमेंट्स; पोलिस निरीक्षक सस्पेंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी अनिल आव्हाड. - Divya Marathi
आरोपी अनिल आव्हाड.
मुंबई - मुंबईच्या एका पोलिस निरीक्षकाने बलात्कार पीडितेला वाईट वागणूक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या पोलिस निरीक्षकाला बुधवारी या कारणावरून निलंबित करण्यात आले . या प्रकरणाची चौकशी सुरू असून प्राथमिक तपासणीत हा अधिकारी असंवेदनशील असल्याचे आढळून आल्याचे अधिकारी म्हणाले. या निरीक्षकाने बलात्कार पीडितेच्या अतंरवस्त्राबाबत अभद्र टिपण्णी केली होती.

मित्राविरोधात केली होती बलात्काराची तक्रार
यासंदर्भातील वृत्तानुसार एका 28 वर्षीय तरुणीने तिच्या मित्राच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. मुलगी आणि तिचा मित्र अनेक दिवसांपासून रिलेशनमध्ये होते. आरोपी मुलाने मुलीबरोबर विवाह करण्याचे वचन दिले होते. पण नंतर त्याने लग्नास नकार दिला. त्यानंतर मुलीने पोलिसांमध्ये त्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी पोलिस निरीक्षक अनिल आव्हाड यांच्यावर सोपवली होती.

असंवेदनशील वर्तणूक
पोलिस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत या पीडितेने असे म्हटले आहे की, चौकशीदरम्यान अनिल यांनी तिला काही आपत्तीकारक प्रश्न विचारले. तसेच तिच्या अंतरवस्त्रांबाबतही कमेंट्स केल्याचे या तरुणीने आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. एवढेच नाही तर, चौकशीच्या नावाखाली तिला बराच वेळ पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते, असेही या तरुणीने सांगितले. या प्रकरणाची चौकशी करणारे मुंबई उत्तरचे पोलिस आयुक्त फतेहसिंह पाटील म्हणाले की, अनिल यांना मुख्यालयाकडून मिळालेल्या आदेशानंतर सस्पेंड करण्यात आले आहे. अशा प्रकारांमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होते, कोणत्याही स्थितीत असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.