आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cops Register Fir Against Sheetal In Fake Paintings Case

100 कोटींची पेटिंग्ज चोरी, सोशलाइट शीतल मफतलाल विरोधात FIR

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उद्योगपती अतुल्य मफतलाल यांची पूर्वाश्रमीची पत्नी आणि सोशलाइट शीतल मफतलाल आरोप करण्याचे हे प्रकरण आहे. शीतलची मैत्रिण यास्मीन आणि तिचा दीर अजय मफतलाल यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या एका याचिकेनंतर मुंबई क्राइम ब्रँचने तक्रार नोंदवून घेतली आहे. दोघांनीही याचिका दाखल करुन शीतलने खोटे आरोप केल्या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
शीतलने आरोप केला होता,की तिची मैत्रिण यास्मिन, आरिफ पटेल आणि फारुख वाडिया यांनी ओरिजनल पेंटिग्ज गायब करुन त्याऐवजी बनावट पेंटिंग ठेवल्या. असे 32 पेंटिग्जबाबत करण्यात आले आणि त्या विकण्यात आल्या. पतीपासून वेगळी झाल्यानंतर शीतलला हे आर्ट वर्क्स मिळाले होते. तिने ते पूर्ण करुन आपल्या मित्रांकडे ठेवले होते. आता शितलवर आपल्या मित्रांविरोधात खोटी तक्रार दिल्याचा खटला चालवला जाणार आहे. तिच्या मित्रांना शीतल विरोधात पुरसे पुरावे असल्याचा विश्वास आहे. तर, पोलिसांचे म्हणणे आहे, की शीतलनेच पेंटिंग्जची आदलाबदल केली आणि लपवून ठेवले. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ओरिजनल पेटिंग्ज देखील जप्त केल्या आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, शीतल मफतलालचे फोटोज्...