आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तक, सिनेमांप्रमाणे अाता नाटकाची चाेरी!, ‘श्रीमंत दामाेदरपंत’चे बेकायदा सादरीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सर्व भाषिक पुस्तकांची व गाण्यांची पायरसी, चित्रपटाचे कथानकाची चोरी अशा अनेक घटना आजवर घडल्या अाहेत. पण अाता चक्क मराठी नाटकांचीही चाेरी व्हायला लागली अाहे. प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव करत असलेल्या ‘श्रीमंत दामाेदरपंत’ या नाटकाची मुंबईतील एका नवख्या कलाकारांचा ग्रुप मूळ निर्मिती संस्था दिग्दर्शक, लेखक यांच्या परवानगीविनाच हे नाटक सादर करत अाहे.

या नाटकाचे दिग्दर्शक केदार शिंदे अाणि लेखक अाेमकार मंगेश दत्त यांनी फेसबुकवर या कलाकारांनी नाटकाचे हुबेहूब केलेले पाेस्टर टाकून हे कलाकार काेण अाहेत, याची माहिती पुरवण्याचे अावाहन चाहत्यांना केले अाहे. हे कलाकार रंगकर्मी असल्याचे भान ठेवत केदार शिंदे यांनी पाेलिसांकडे तक्रार करण्याचे मात्र सध्या टाळलेले अाहे.

‘सहा वाजले गंमत पाहा’ या गाजलेल्या टॅगलाइनपासून दामाेदरपंतांच्या वेशभूषेपर्यंत हुबेहूब नक्कल दिसणारे पाेस्टर नजरेस पडल्याने केदार शिंदे अाणि अाेमकार यांनी फेसबुकवर याविषयी वाचा फाेडली अाहे.

समज देणार : केदार
भरत जाधव एंटरटेनमेंटच्या निर्मितीखाली हे नाटक सध्या नव्याने गाजते अाहे. त्यामुळे नवख्या कलाकारांना या नाटकाचा माेह झाला असल्यास त्यात काहीच नवल नाही. पण अशा तऱ्हेने विनापरवानगी एखादे व्यावसायिक नाटक जसेच्या तसे उचलणे गैर अाहे. त्यामुळे या नवख्या कलाकारांना समज देऊन नाटक थांबवायला हवे असे केदार यांचे म्हणणे अाहे. अजून पाेलिसांत हे प्रकरण नेले नसल्याचे ते म्हणाले.