आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिठीच्या गाळाची पालिकेला चिंता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई पालिकेला नाल्यांमधील गाळ टाकण्यास एकही डंपिंग ग्राउंड नाही, त्यातच यंदा मिठी नदीच्या गाळाचा बोजा पालिकेवर पडला आहे. त्यामुळे मिठीतील 1 लाख घनमीटर गाळ टाकायचा कोठे, अशी चिंता पालिकेला सतावते आहे.

2005 मध्ये मिठी नदीला आलेल्या पुराने मुंबईची मोठी वाताहत झाली होती. त्यानंतर राज्य शासनाने मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण आणि सुशोभीकरणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे सोपवले. मिठीच्या तीरावरील 5 हजार अतिक्रमणे काढण्यात आली तसेच मिठीतून 30 लाख घनमीटर गाळ काढून मिठीचे पात्र रुंद करण्यात आले. मिठीतील गाळ पावसाळ्यापूर्वी काढण्याची जबाबदारी यापूर्वी पालिका आणि एमएमआरडीए अशी दोघांची असे. यंदा मात्र संपूर्ण जबाबदारी पालिकेवर सोपवण्यात आली आहे. पालिका इतर नाल्यांमधून प्रतिवर्षी 4 लाख घनमीटर गाळ काढते. तो टाकण्यासच पालिकेकडे डंपिंग ग्राऊंड नाही. त्यात आता मिठीतील गाळाची भर पडल्याने पालिकेसमोर गाळाचा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. मुंबईत डंपिंग ग्राउंडचा प्रश्न अधिक जटिल बनल्याने पालिकेने गाळाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांवर सोपवली आहे. विशेष म्हणजे टेंडरमध्ये प्रशासनाने तशी अटच घातली आहे. परंतु मुंबईत गाळ टाकण्यासाठी जागाच शिल्लक नाही.
नसल्याने ठेकेदार सध्या मुंबईबाहेर जागेचा शोध घेत आहेत.