आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी नागपूरकडे पाहा, गुंडगिरीत ‘शिकागो’लाही मागे टाकले की काय? \'सामना\'तून सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गुंडगिरी व महिलांवरील अत्याचाराविरोधात गेल्या सहा महिन्यांत किमान दीडशे वेळा नागपूरची जनता रस्त्यावर उतरली आहे. तिने आक्रोश केला आहे. पोलिसांशी संघर्ष केला आहे, पण न्याय आणि सुरक्षा मागणाऱ्या जनतेवर पोलिसांनी लाठ्या चालवल्या. गेल्या कित्येक वर्षांत पाटण्यात असे प्रकार घडल्याची नोंद नाही. तेव्हा मुख्यमंत्री, आधी नागपूरकडे पाहा. मुख्यमंत्र्यांसह भाजप मंत्र्यांची भाषणे ही फक्त धूळफेक आहे. शिवसेनेने मुंबई वाचवली आहे.

नागपूरसारखी शहरे भाजपच्या मगरी जबड्यातून वाचवायला हवीत. नागपूरचे ‘शिकागो’ होत आहे काय? असा खोचक सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या संपादकीयमधून केला आहे.  

मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण भाजप सार्वजनिक मंडळाचे लक्ष मुंबईकडेच आहे. महाराष्ट्र राज्यात इतरही अनेक जिल्हे आणि शहरे आहेत याचा विसर सरकार चालविणाऱ्यांना पडलेला दिसतोय. मुख्यमंत्री फडणवीस नागपूरचे प्रतिनिधित्व करतात. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आपल्या स्वत:च्या हक्काच्या नागपूरला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री व त्यांचे लोक मुंबई-पुण्यावरच त्यांच्या गिधाडी घिरट्या मारीत असल्याची टीका करण्यात आली आहे. 

पुढील स्लाइड्‍सवर वाचा... नागपुरातील उकिरडा कसा साफ करता येईल, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...