आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानगरपालिका आज सादर करणार अर्थसंकल्प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बृहन्मुंबई महापालिकेचा 2013-14 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सोमवारी पालिका आयुक्त सीताराम कुंटे सादर करणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प तब्बल 28 हजार कोटींपर्यंत गेला असून त्यात पाणीपुरवठा आणि ई-प्रशासनाला अधिक टक्का मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महापालिकेचा गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प 26 हजार 581 कोटी रुपयांचा होता. तत्कालीन आयुक्त सुबोधकुमार यांनी कंत्राट व्यवस्थेत केलेल्या धाडसी बदलांमुळे त्यातील 40 टक्के रक्कमही अजून खर्च झालेली नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात पाणीपुरवठा विभाग, रखडलेले प्रकल्प आणि ई-प्रशासनाला अधिक वाटा मिळण्याची शक्यता आहे. पालिकेवर युतीची सत्ता असून पाणीपुरवठ्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आग्रही आहेत. आयुक्त कुंटे यांचा ई-प्रशासनावर अधिक भर आहे, तर रखडलेल्या प्रकल्पांविषयी नगरसेवक आक्रमक झाले आहेत.