आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेविका गीता गवळी यांचा भाजपला पाठिंबा, शिवसेनेला धक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई महापौरपदासाठी डॉन अरुण गवळीची कन्या आणि अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा देऊन शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचा महापौर बनवण्यासाठी गेली दहा वर्षे गीता यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता.
 
मात्र, यंदा महापालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढत असल्याने पहिल्यांदाच गवळींविरोधात शिवसेनेने अधिकृत उमेदवार रिंगणात उतरवला होता, तरीही गीता गवळी शिवसेनेशी वाटाघाटी करण्यास तयार होत्या. उद्धव ठाकरे यांची गीता गवळी यांच्याशी फोनवर चर्चा झाली होती. मात्र, बोलणी फिसकटल्याने त्यांनी भाजपला पाठिंबा दिला.
 
बातम्या आणखी आहेत...