आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corporators Sheetal Mhatre Resigned, Allaged On MLA Ghosalkar

नगरसेविका शीतल म्हात्रेंचे राजीनामा अस्त्र ,आमदार घोसाळकर ‘राक्षस’ असल्याचा जाहीर आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेचा रस्त्यावरचा राडा आतापर्यंत सर्वांना माहीत होता, पण आमदार विरुद्ध नगरसेविका अशी जोरदार लढाई सध्या दहिसरमध्ये बघायला मिळत आहे. शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर हे ‘विकृत राक्षस’ असल्याचा आरोप करत याच पक्षाच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी राजीनाम्याचे अस्त्र उगारले आहे. फक्त माझ्याच बाबतीत नव्हे, तर शिवसेना महिला पदधिकारी तसेच इतर नगरसेविकांनाही घोसाळकरांच्या विकृतपणाचा प्रचंड त्रास होत आहे, असा घरचा आहेर देण्यासही म्हात्रे विसरल्या नाहीत.
या प्रकाराला पार्श्वभूमी आहे ती दहिसरच्या स्वच्छतागृहातील आक्षेपार्ह मजकुराची. स्वच्छतागृहात शीतल म्हात्रे व शुभा राऊळ यांचे मोबाइल क्रमांक देण्यात आले होते. या क्रमांकामुळे दोन्ही नगरसेविकांना आक्षेपार्ह फोन येऊ लागले. परिणामी आपल्याला प्रचंड त्रास होत असून या प्रकाराविषयी दोन्ही नगरसेविकांनी मातोश्रीवर धाव घेऊन आपल्याला न्याय द्या, अशी विनंती केली. प्रसंगी दोघींनीही सोशल साइटवरून झाल्या प्रकाराची वाच्यता करून ‘द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णा धाव’ अशी आर्जवही केली. विनंती करून, धावा करून शिवसेना पक्षप्रमुखाच्या कानी आपले गार्‍हाणे जात नाहीत हे लक्षात येताच म्हात्रे यांनी राजीनाम्याचे अस्त्र उगारले आहे. ‘मीच नव्हे, तर गोरेगावपासून पुढे दहिसरमध्ये शिवसेनेतील प्रत्येक पदाधिकारी, नगरसेवक आमदारांच्या दडपणाखाली आहे. ते म्हणतील तीच पूर्व दिशा आहे.
.तर संन्यास घेऊ : घोसाळकर
आपल्यावर झालेले आरोप निराधार असून आरोप सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेऊन, असे विनोद घोसाळकर यांनी सांगितले आहे.
घाडी दांपत्याचाही शिवसेनेला जय महाराष्ट्र!
शिवसेनेचे माजी उपनेते संजय घाडी व त्यांच्या पत्नी आणि आक्रमक संघटक संजना घाडी यांनाही घोसाळकर यांच्या कार्यपद्धतीचा मोठा फटका बसला होता. मनसेला मदत करून घोसाळकरांनी आपली राजकीय कारकीर्द संपवली आणि त्याचे पुरावे घाडी यांनी मातोश्रीवर दिले होते. स्वत: संजना घाडींनी घोसाळकरांच्या हुकूमशाहीचा पाढा मातोश्रीवर वाचला. त्यांना लवकर न बदलल्यास गोरेगाव ते दहिसरमधील शिवसेना संपेल, असा इशाराही घाडींनी दिला होता.