आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Corrupt Officer Immoderate Dismiss In Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाचखोर अधिकार्‍यांची तत्काळ हकालपट्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बेहिशेबी मालमत्ता व लाचखोरीचे गुन्हे सिद्ध झालेल्या सरकारी अधिकार्‍यांना त्वरित सेवामुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. गुन्हे सिद्ध झालेले अधिकारी सेवेत आढळले तर त्या विभागाच्या प्रमुखावर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी अशा अधिकार्‍यांना त्वरित सेवामुक्त करण्याचे आदेश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना दिले. दोषी अधिकारी कारवाईच्या कक्षेत न येण्याला जबाबदार ठरणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून खुलासे मागवण्यात येणार आहेत. समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास वरिष्ठ अधिकार्‍यावर कारवाई होणार आहे.

सध्या २८ अधिकारी : लाचखोरी व बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी दोषी ठरलेले २८ अधिकारी सध्या विविध खात्यांत कार्यरत आहेत. अनेकांनी वरच्या कोर्टात अपील केल्याची सबब देत कारवाईला बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. हे अधिकारी महसूल, बांधकाम, आरोग्य, विक्री विभागात वर्ग एक, दोन, तीन श्रेणीतील आहेत.