आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KDMC मधील लाचखोर अभियत्यांची गळफास घेऊन आत्महत्या!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील लाचखोर अभियंता दत्तात्रय मस्तुद (वय 46) यांनी आज पहाटे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. गेल्या वर्षी मस्तुद यांना एसीबीने लाच घेताना रंगेहात पकडले होते, तसेच आजाराने त्रस्त होते. या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तसेच त्यांनी घरात कोणतेही सुसाईड नोट लिहून ठेवली नसल्याचे तपासात आढळून आले आहे.
याबाबत ठाण्यातील खडकपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय मस्तूद कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत उप अभियंता या पदावर कार्यरत होते. गेल्या वर्षी त्यांना लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले होते. या प्रकरणात माजी नगरसेवक विद्याधर भोईर यांनाही अटक झाली होती. या कारवाईनंतर मस्तुद यांच्याकडे मोठे घबाड असल्याचे पुढे आले होते. एसीबीच्या चौकशीत मस्तूदच्या नावे 7 फ्लॅट व काही मालमत्ता आढळून आली होती. त्यावेळी त्यांना सेवेतून निलंबितही करण्यात आले होते.
सोमवारी रात्री पत्नी व मुलासह मस्तूद घरात होते. रात्री एक वाजताच्या सुमारास मस्तूद यांनी पत्नी व मुलगा झोपलेल्या बेडरूममधून दुस-या बेडरूममध्ये प्रवेश केला व तेथे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मस्तूद सध्या एका आजाराने त्रस्त होते. लाचखोरीचा बसलेला शिक्का व जडलेले आजारपण यामुळे मस्तूद नैराश्यात होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मस्तूद यांनी घरात कोणतीही सुसाईड नोट लिहली नसल्याचे खडकपाडा पोलिसांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...