आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेणारच : येचुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यूपीएच्या भ्रष्ट मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपप्रणीत एनडीएने संसद ठप्प केली होती. ए.राजा, नटवरसिंग, पवन बन्सल यांचे राजीनामे घेऊनच त्यावेळी भाजप शांत झाली होती. मात्र, आता भाजपच्या मंत्र्यांचे हात भ्रष्टाचारात बरबटले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत बसले आहेत, अशी टीका त्यांनी माकपच्या सीताराम येचुरी यांनी शनिवारी केली.
केंद्र, राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात शनिवारी भायखळा ते आझाद मैदान येथे राज्यव्यापी मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या वेळी येचुरींनी मोदीं सरकारच्या कारभाराचा समाचार घेतला. मनमोहन सरकारच्या भ्रष्ट मंत्र्यांच्या बाबतीत जो मापदंड लावण्यात आला होता, तोच मोदी सरकारबाबतीत लावला जाईल. दोन आठवडे होऊनही संसदेवर कामबंदीचे सावट आहे. सोमवारी भाजपने विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. पण, ते तुम्ही या, बघू या. असे संदिग्ध बोलत आहेत. भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेतल्यािशवाय विरोधी पक्ष शांत बसणार नाही.

भाजपचे केंद्रातीलच नव्हे तर त्यांचे राज्य असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र या राज्यांमध्येही मंत्र्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. कायम नितीमत्तेचा आव आणणारे भाजप आता कुठल्या तोंडाने पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणार आहे, ते आता आम्हाला बघायचे आहे, असे येचुरी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...