आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corruption In Water Filter, Biscuit Dhananjay Munde

वॉटर फिल्टर, बिस्किटांतही भ्रष्टाचार: धनंजय मुंडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महिला व बालकल्याण विभागाने ई-निविदा प्रक्रिया न राबवता चिक्की, बिस्किटे, वॉटर फिल्टर, चटयांसह विविध २१ वस्तूंची २०६ कोटींची खरेदी एका दिवसात करून भ्रष्टाचाराचा विक्रम केला. याची व शिक्षण विभागातील १९१ कोटींची अग्निशमन यंत्र खरेदी, खादी व ग्रामोद्योग विभागातील ३ कोटींच्या पुस्तक खरेदीसह सर्व भ्रष्टाचाराची न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी. तोपर्यंत संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी गुरुवारी केली. विरोधी पक्षाच्या २६० च्या प्रस्तावावर परिषदेत घमासान चर्चा झाली. त्यावेळी मुंडे बोलत होते.

मुख्यमंत्र्यांचे ३ लाखांवरील सर्व कंत्राटे ई निविदा पद्धतीने काढण्याचे आदेश असताना महिला व बालकल्याण विभागाने १६६ कोटी रु.चे चिक्कीचे कंत्राट कसे काय दिले, यामध्ये अनेकांचे हात ओले झाल्याचा आरोप मुंडे यांनी केला. चिक्की खरेदीत दर करार झाला नसून ही खरेदी दर निश्चितीने झाल्याचे नमूद करत कंत्राटदाराला अधिकचा लाभ मिळावा यासाठी अशी पद्धत अवंबल्याचा आरोप मुंडे यांनी केला. महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाड्यांसाठी राजगिरा लाडूचा प्रस्ताव दिला होता. मात्र, सूर्यकांता महिला संस्थेकडे २०१३ मध्ये बनवलेल्या चिक्कीचा साठा पडून होता. त्यामुळे लाडूचा प्रस्ताव रद्द करून चिक्कीचे कंत्राट दिदल्याचा आरोप मुंडे यांनी केला.
फिल्टरचाही घोटाळा
अंगणवाडीसाठी खरेदी केलेल्या वॉटर फिल्टरमध्येही घोटाळा झाला आहे. दरकरार होण्याआधीच कंत्राट देण्यात आले. ४५०० रु.चे एक यंत्र खरेदी करण्याचा प्रस्ताव असताना ५२०० रुपयांनी खरेदी करण्यात आली. अंगणवाड्यात विजेचे कनेक्शनच नसल्यामुळे आज हे वॉटर प्युरीफायर पडून असल्याचा दावा मुंडे यांनी केला.