आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस राजवटीत महागाई वाढली; राम नाईक यांचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- यूपीए सरकारच्या कारभारामुळे जीवनावश्यक गोष्टी दुर्लभ झाल्या असून सर्व प्रकारच्या उत्पादनात घट झाली आहे. महागाई प्रचंड वाढल्याने आम आदमीचे जगणे मुश्कील झाले आहे, असा आरोप भाजप नेते राम नाईक यांनी गुरुवारी केला. या वेळी त्यांनी तत्कालीन रालोआ सरकार व सध्याचे यूपीए सरकारच्या काळातील महागाईची आकडेवारीच सादर केली.

पत्रकार परिषदेत नाईक म्हणाले, वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत एक डॉलरचा विनिमय दर 45 रुपये दहा पैसे होता तो आज 56 रुपये 76 पैशांवर पोहोचला आहे. रुपयाचे अवमूल्यन झाल्याने जीवनावश्यक वस्तुंच्या किमतीत वाढ झाली आहे. निर्यातीपेक्षा आयात जास्त होत असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसत आहे. यूपीए सरकारच्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीत डिझेलचे दर 22.50 रुपयांवरून 57.88 रुपये तर पेट्रोल 33.15 रुपयांवरून 72.21 रुपये झाले आहेत. कांदा सहा रुपयांवरून 22 रुपये, रॉकेल 18 रुपयांवरून 50 रुपये झाले आहे. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये आतापर्यंत चार वेळा पेट्रोलियम मंत्री बदलण्यात आले तरीही याबाबत आंतरराष्ट्रीय धोरण ठरवण्यासाठी ठोस पावले उचलली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. गोव्यात होणाºया भाजपच्या बैठकीत महागाईविरोधात करण्यात येणाºया आंदोलनाची रणनीती ठरवण्यात येईल असेही ते म्हणाले.