आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Council For The Indian School Certificate Examinations Result

\'ICSE\'त मुंबईची अनन्या पटवर्धन देशात पहिली, तेजन साहू, अनिश दिक्षीत चमकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र- अनन्या पटवर्धन (फाईल फोटो)
मुंबई- काऊंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्झामिनेशन (ICSE) च्या दहावीच्या परीक्षेत मुंबईच्या अनन्या हर्षद पटवर्धन हिने देशात पहिला पटकावला आहे. ती मुंबईतील विले पार्लेमधील सीएमएम शाळेची विद्यार्थिनी आहे. अनन्याने तब्बल 99.02 टक्के अंक मिळवत देशात प्रथम क्रमांकावर येण्याचा मान मिळवला आहे. अनन्याला कायद्याचे शिक्षण घ्यायचे आहे. नवी मुंबईतील सेंट मेरीज शाळेचा तेजन तपन साहू यानेही बालक वर्ग विभागात देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. तर मुंबईतील गोकुळधाम शाळेतील अनिश दिक्षीत आयसीएसईत देशात तिसरा आला आहे.
आज सकाळी साडेअकरा वाजता आयसीएसईचा देशभर निकाला जाहीर झाला. त्यात 10 वी ( ICSE) आणि 12 वी (ISC) निकाल आले आहेत. हे निकाल तुम्ही काउऊंसिलची अधिकृत वेबसाईट www.cisce.org वर लॉग इन करून पाहू शकता. आयसीएसईची 10 वीची परीक्षा 26 फेब्रुवारी ते 30 मार्च 2015 यादरम्यान झाली होती. यात जवळपास दीड लाख विद्यार्थ्यांनी 10 वीची बोर्ड परीक्षा दिली होती. तर, आयसीएसई (इंडियन स्कूल सर्टिफिकेट) 12 वीची परीक्षा 9 फेब्रुवारी ते 1 एप्रिलदरम्यान झाली होती. ही परीक्षा सुमारे 70 हजार विद्यार्थ्यांनी दिली होती.