आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईः विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. मुंबईत शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील विजयी झाले आहेत. मनिषा कायंदे यांचा मोठ्या फरकाने त्यांनी पराभव केला आहे. कायंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना-भाजपमध्ये तणाव निर्माण झाला होता. कपिल पाटील यांना ९७४९ मते मिळाली तर मनिषा कायंदे यांना केवळ ६३१ मते मिळाली. अपक्ष उमेदवार बाळासाहेब म्हात्रे यांना १५२९ मते मिळाली.
सर्वात धक्कादायक निकाल म्हणजे ठाण्यातून वसंत डावखरे यांचे चिरंजीव निरंजन यांचा विजय झाला आहे. भाजपचे संजय केळकर यांचा त्यांनी अटीतटीच्या लढतीत पराभव केला. दुपारी 12 वाजता मिळालेल्या अपडेटनुसार संजय केळकर हे फक्त 25 मतांनी आघाडीवर होते. परंतु, दुस-या टप्प्यानंतर डावखरेंनी आघाडी घेतली. भाजपसाठी हा फार मोठा धक्का आहे.
पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे दिपक सावंत विजयी झाले आहेत. त्यांचा विजय निश्चितच मानला जात होता. दीपक सावंत यांनी राष्ट्रवादीचे राजेश टेके यांचा पराभव केला. दीपक सावंत यांना १४०४२ मते मिळाली तर टेके यांना १२९८ मते मिळाली आहेत.
विधान परिषदेच्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांची शक्ती पणाला लागली आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले होते. त्यापैकी मुंबई आणि ठाणे पदवीधर मतदार संघाकडे सर्वांच लक्ष लागले आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे, भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर आणि मनसेच्या पाठिंब्यासह रिंगणात असलेले राष्ट्रवादीचे बंडखोर निलेश चव्हाण यांच्यात झुंज आहे. हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. पण यावेळी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचे पुत्र निरंजन डावखरेंच्या उमेदवारीमुळे प्रचंड रंगत निर्माण झाली आहे.
मुंबई पदवीधरसाठी शिवसेनेचे विद्यमान आमदार दीपक सावंत रिंगणात आहेत. त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
राष्ट्रवादीच्या बंडखोराला मनसेची साथ
विधान परिषद निवडणूक : मुख्यमंत्र्यांची कसोटी
राष्ट्रवादीला भाजप चालतो, आम्ही नाही : माणिकराव
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.