आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरातील सहज वावराचे श्रेय श्यामाप्रसाद मुखर्जींना - देवेंद्र फडणवीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘एकता व अखंडतेसाठी बलिदान देणारे तत्त्वज्ञानी, शिक्षणतज्ज्ञ आणि जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा हा देश सदैव ऋणी राहील. त्यांनी केलेला त्याग देशातील जनता कधीही विसरू शकणार नाही. कारण जर आज काश्मीरमध्ये लोक सहज ये- जा करीत आहेत, त्याचे श्रेय फक्त आणि फक्त डॉ. मुखर्जी यांना जाते,’ असे गाैरवाेद््गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी काढले. डॉ. मुखर्जी यांच्या पुण्यतिथीचे अाैचित्य साधून अायाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेतेे. केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांचीही प्रमुख उपस्थिती हाेती.

या वेळी ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांचा पत्रकारितेतील कार्याबद्दल डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती सन्मान देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गाैरव करण्यात अाला. डॉ. मुखर्जी यांच्या जीवनामधील काही विशेष अशा घटनांवर प्रकाश टाकताना कलराज मिश्र म्हणाले, ‘आज पश्चिम बंगाल आणि पंजाब भारताचा अविभाज्य भाग आहेत तर त्याचे संपूर्ण श्रेय डॉ. मुखर्जी यांना जाते. मुखर्जी यांनी जे स्वप्न पाहिले होते त्याला माजी पंतप्रधान अटलबिहारी यांनी पुढे नेले आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या स्वप्नांना पूर्ण करीत आहेत. त्यामुळेच आज काश्मीरपासून आसामपर्यंत भाजपचे सरकार अाहे.’

पत्रकारांनी फक्त पत्रकारिताच करावी
सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र म्हणाले, ‘पत्रकारांनी फक्त आणि फक्त पत्रकारिता केली पाहिजे. त्यांच्याकडे एक कलम, एक पॅड, सत्य पाहणारे दोन डोळे, चौकस काम आणि सत्य विचारण्याची हिंमत असणारी वैखरी अर्थात जीभ असली पाहिजे. नानी पालखीवाला यांनी जवळजवळ १५ वर्षांपूर्वी सांगितले होते की, मीडियाने नि:पक्षपणे बातमी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जे लोक आज मीडियाचा सन्मान करीत आहेत, ते लोक भविष्यात मीडियाचा एक तर द्वेष करतील नाही तर घाबरतील, तिचा सन्मान करणार नाहीत.’
बातम्या आणखी आहेत...