आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Country's First Mono Rail Will Start In Mumbai From August

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशातील पहिली मोनोरेल ऑगस्टपासून मुंबईत सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशातील पहिली मोनोरेल ऑगस्टपासून मुंबईत धावू लागणार आहे. वडाळा ते चेंबूर हा मोनोरेलचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून फक्त सेफ्टी ऑडिटसह सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशनचे काम बाकी असून ऑगस्टपासून मुंबईकरांच्या सेवेला मोनोरेल असेल, अशी माहिती एमएमआरडीएच्या अध्यक्षांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

मुंबईकरांची वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी मेट्रो रेलसह मोनोरेलची योजना आखण्यात आली होती. त्यानुसार शनिवारी वडाळा ते चेंबूर या पहिल्या टप्प्यातील प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, एमएमआरडीएचे अध्यक्ष राहुल अस्थानाही उपस्थित होते.

राहुल अस्थाना यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, पहिल्या टप्प्यातील बीम बसवण्याचे काम पूर्ण झाले असून फक्त सुरक्षा प्रमाणपत्र बाकी आहे. ट्राम वे कायद्यांर्तगत ही सेवा येत असल्याने रेल्वेकडून याला परवानगी मिळणे आवश्यक आहे. मेट्रो रेलला रेल्वेने परवानगी दिली आहे, परंतु मोनोरेलला अजूनही परवानगी मिळालेली नाही. सुरक्षा प्रमाणपत्रासाठी मे. सिंगापूर मास रॅपिड ट्रान्झिट अ‍ॅथॉरिटी यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली असून रेल्वे सुरक्षा विभागाच्या निवृत्त आयुक्तांची निवड केली आहे. सिग्नल यंत्रणा आणि टेलिकम्युनिकेशनचे काम बाकी असून ते ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच मोनोरेल मुंबईकरांच्या सेवेत उपस्थित होईल, असेही राहुल अस्थाना यांनी सांगितले. या मोनोरेलचा मुंबईकरांना भरपूर फायदा होईल. तसेच यामुळे प्रवासातही वेळेची बचत होऊन लवरच पोहोचण्यास मदत होणार आहे.

वडाळा ते जेकब सर्कल दुसरा टप्पा
मोनोरेलचे काम जून 2011 मध्ये पूर्ण होणार होते, परंतु ते रखडत गेल्याने डिसेंबर 2012 चा मुहूर्त काढण्यात आला. पुनर्वसनाचा प्रश्न सार्वधिक बिकट होता. त्यामुळे आता ऑगस्ट 2013 चा मुहूर्त काढण्यात आला आहे. प्रकल्प रखडल्यामुळे त्याचा खर्च वाढल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, राहुल आस्थाना यांनी प्रकल्पाचा खर्च तीन हजार कोटी रुपयेच आहे असे सांगून मोनोरेलचा दुसरा टप्पा वडाळा ते जेकब सर्कल पुढील वर्षी सुरू होईल, असे सांगितले.

अधिका-यांचे अभिनंदन
मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी सांगितले की, मोनोरेलमुळे मुंबईकरांची वाहतुकीची समस्या सुटण्याची शक्यता आहे. मोनोरेलमधून प्रवास करणा-यांच्या सुरक्षिततेची आम्ही संपूर्ण काळजी घेतलेली आहे. अनेक अडचणींवर मात करीत एमएमआरडीएने काम पूर्ण केल्याबद्दल त्यांनी अधिका-यांचे अभिनंदनही केले.