आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात जोडप्याची आत्महत्या, राहत्या घरात गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ठाणे शहरातील पडवळनगर परिसरातील शिवनेरी सोसायटीत राहणा-या एका तरूण जोडप्याने आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. भरत चव्हाण व निशा चव्हाण असे जोडप्याचे नाव आहे.
भरत आणि निशा यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. स्थानिक लोकांनी पोलिसांना कळवले असून, पोलिस चौकशी करीत आहेत. चव्हाण यांच्या नातेवाईकांकडे चौकशी करण्यात येत आहे. मात्र हे कुटुंब आर्थिक अडचणीत होते हे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे आर्थिक चणचणीतून ही घटना घडली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे.