आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये सेक्स चेंज ऑपरेशन दरम्यान भेटलेल्या कपलला आपल्या लग्नाचे सरकारी प्रमाणपत्र मिळालेले नाही. केरळचा राहणारे आरव आणि सुकन्या तीन वर्षापूर्वी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये भेटले होते. त्यावेळी दोघेही अनोखळी होते. मात्र, दोघेही मल्याळी भाषेत बोलत असल्याने त्यांच्यात मैत्री झाली आणि पुढे प्रेम झाले. काही काळानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला व दोन महिन्यापूर्वी त्यांनी मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये याबाबत रीतसर अर्ज केला आहे. तीन महिने झाले तरी रजिस्ट्रारने कोणतेही अंतिम निर्णय दिलेला नाही. आता दोघांना मिळताहेत धमक्या...
- मॅरेज रजिस्ट्रारचे म्हणणे आहे की, अशा लग्नाला परवानगी देता येते का हे तपासून पाहावे लागेल.
- या दोघांची स्टोरी सोशल मिडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांना अनेक प्रकारच्या टीका सहन करावी लागली. सोबतच धमक्याही मिळाल्या.
- सुकन्याने सांगितले की, एका व्यक्तीने मला फेसबुकवर जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ज्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. याचे लग्नाला परवानगी न देणे हे सुद्धा याचे कारण असल्याचे या दोघांचे म्हणणे आहे.
- या जोडप्याचे आता म्हणणे आहे की, सेक्स चेंज केल्यानंतर यातील एक मेल आहे तर एक फिमेल आहे. त्यामुळे स्पेशल मॅरेज अॅक्टला दोघांच्या लग्नाला मंजूरी मिळायला हवी.
अशी झाली चंदूची सुकन्या-
- आरवप्रमाणेच केरळमध्ये राहणाऱ्या सुकन्या कृष्णन (वय 22) चा जन्म एका पुरुषाच्या रुपात झाला. तिचे नाव चंदू असे ठेवण्यात आले.
- वाढत्या वयाबरोबर सुकन्याच्या लक्षात येऊ लागले की आपल्या भावना या महिलेप्रमाणे आहेत. वय वाढू लागल्यावर तिने महिलांचा पेहराव करणे सुरु केले.
- तिला अनेक जण हिजडा म्हणू लागले. लोकांच्या तिरस्काराचा सामना करत ती सॉफ्टवेअर इंजिनिअर झाली. ती बंगळुरु येथे एका मोठया सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे.
असा झाला बिंदूचा आरव-
- केरळचा राहणारा आरव अप्पुकुट्टटन (वय 46) याचा जन्म एका मुलीच्या रुपात झाला होता. त्याच्या पालकांनी त्याचे नाव बिंदू असे ठेवले.
- टूर मॅनेजर असणाऱ्या आरवच्या आई-वडिलांचे तो लहान असतानाच निधन झाले. त्यानंतर तो अनेक देशांमध्ये विविध शहरांमध्ये राहत होता.
- त्याला जाणवू लागले की आपले शरीर जरी महिलेचे असले तरी आपल्या भावना या पुरुषाच्या आहेत.
- त्यानंतर त्याला दाढी-मिशाही आल्याने त्याने एका मुलाचे जीवन जगण्याचा निर्णय घेतला.
- आरव मुलांप्रमाणेच राहत होता. दुबईत असताना त्याला लिंगबदल शस्त्रक्रियेबद्दल माहिती मिळाली.
अशी झाली या दोघांची भेट-
- या दोघांची भेट ही निव्वळ योगायोगाने झाली. हे दोघे मुंबईतील कोकिळाबेन एकाच दिवशी त्या हॉस्पिटलमध्ये आले होते.
- दोघेही वेगवेगळ्या रूपात होते. त्यामुळे बोलण्याचा किंवा हा विषय चर्चा करण्याचे काहीच कारण नव्हते.
- मात्र, या दोघांतील एक समान दुवा होता. तो म्हणजे त्यांचे केरळी असणे. पण तेही त्यांना माहित नव्हते.
- मात्र, दोघे हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये थांबले असताना बिंदूला फोन केरळमधून फोन आला होता. त्यावेळी बिंदू मल्याळम भाषेत बोलू लागला.
- इकडे, चंदूचे मोबाईलवर बोलतानाचे संभाषण बिंदूच्या कानावर पडत होते. त्यावेळी तिला एवढेच कळाले की संबंधित व्यक्ती केरळी आहे.
- यानंतर त्यांनी मातृभाषेत संवाद साधला. थोडीफार चर्चा झाल्यानंतर बिंदूने चंदूला तिचा प्रॉब्लेम सांगितला मग चंदूने त्याची समस्या बिंदूशी शेयर केली. यातून त्यांच्यात मैत्री झाली आणि पुढे सेक्स चेंज ऑपरेशन झाल्यानंतर ते प्रेमात पडले.
- आता काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी मॅरेज रजिस्ट्रारकडे रितसर अर्ज केला आहे. मात्र अद्याप त्यांना प्रमाणपत्र दिले नाही. आता ते मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ते मंदिरात परंपरेप्रमाणे लग्न करणार आहेत. मात्र, या जोडप्याला आता धमक्या येत आहेत.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या यूनिक अशा जोडप्याचे फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.